आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Accident, Divya Marathi

अवकाळी तांडवाचे तीन महिलांचा बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवी पाटील - Divya Marathi
श्रीदेवी पाटील

मोहोळ / अक्कलकोट - वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे मंगळवारी नागणसूर (ता. अक्कलकोट) येथे पत्र्यावरील दगड अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर 24 तासांच्या आत जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजूर महिला जागीच ठार झाल्या. लांबोटी (ता. मोहोळ) येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत अवकाळी संकटातील मृतांची संख्या तीन झाली आहे. सीता हणमंत ढेरे (वय 30) व नंदा जयवंत धावणे (42, दोघी रा. अर्जुनसोंड, ता. मोहोळ) अशी वीज कोसळून मृत्यू पावलेल्या महिलांची नावे आहेत.


सीता ढेरे आणि नंदा धावणे लांबोटी येथील सुधीर दगडू ननवरे यांच्या शेतात उसाचा पाला काढण्याचे काम करीत होत्या. दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी वीज अंगावरून पडल्याने या दोघींचा मृत्यू झाला. घटनेची मोहोळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी नागणसूर (ता. अक्कलकोट) परिसरात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे शेतातील शेडवरील पत्रे उडाले. त्यावरील दगड डोक्यावर पडून श्रीदेवी चन्नप्पा पाटील (वय 42) ही महिला ठार झाली. पती चन्नप्पा यांनी त्यांना बाहेर क ाढले. पण तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांना हणमंता (वय 20), शिवलाल (11) ही दोन मुले व नीलाबाई (17) आणि अंबिका (23) या दोन मुली आहेत. घटनेचा मंडल अधिकारी, तलाठय़ांनी पंचनामा केला. दरम्यान, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सांगोला, मोहोळसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. मंद्रूपमध्ये बुधवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडीत होता.