आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना आनंद घेणे शिकवा - अरूणा ढेरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - निसर्गाची नाळ मुलांशी बांधून ठेवा. त्यांच्या संवेदना जपण्यासाठी छोट्या गोष्टीतलाही आनंद घेण्याचेही शिकवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी केले.


हिराचंद नेमचंद वाचनालय व दिशा अभ्यास मंडळाच्या वतीने बुधवारी अँम्फी थिएटरमध्ये ‘सर्जनशील पालकत्व’ या विषयावर व्याख्यान आयोजिले होते. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पी. के. जोशी होते. या वेळी अँड. नीला मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


अरुणा ढेरे म्हणाल्या, ‘पालक म्हणून मुलांच्या कलानुसार करता येतील तशा गोष्टी करा. गोष्टी सांगणे, पुस्तकांची आवड लावणे, मुलांना मेहनत करायला सांगणे, आळस करू नये. त्यांच्यासोबत प्रत्यक्ष वेळ देणे, भौतिक सुखापेक्षा मुलांना वेळ द्या. त्याने मुलांच्या मनावर कायमचे संस्कार होतात. एखादी गोष्टी ही त्या मुलांच्या मनावर अखंड प्रभाव करते. मुलांसोबत बसून थोडावेळ घालवल्यास त्यांच्या अनेक प्रo्नांची उत्तरे त्यांना मिळतात. कार्यक्रमाच्या प्रारंभी अरुणा बुरूटे यांनी प्रास्ताविक केले. आश्लेषा देखणे यांनी सूत्रसंचालन केले. चित्रा कवठेकर यांनी आभार मानले.


समर्पित स्त्री द्रोपदी
माणसाने आदर्श कसे जगावे हे रामायण शिकविते आणि मानवाच्या स्वभावाच्या गुंतागुंतीचा, मानव कसा आहे याचा अभ्यास करायला लावणारे महाभारत आहे., असें विचार ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी सायंकाळी ‘स्त्री मुक्ती व महाभारतातील द्रौपदी’ या विषयांवर मांडले. द्रोपदीचा जन्म, स्वयंवर आणि द्युत युध्दपर्यंतचा प्रवास त्यांनी उदाहारणांसह उलगडला.


दिनूचे बिल’ने उपस्थितांचे डोळे पाणावले
श्रीमती ढेरे यांनी सुजान पालकत्व विषयासंदर्भात बोलताना प्र. के. अत्रे यांच्या ‘दिनूचे बिल’चे उदाहरण दिले. एका छोट्या मुलाला आपण आईचे काम करतो, तेव्हा त्याचे बिल मागावे असे त्याला वाटते, तो बिल मागतो. तर त्याच्या उलट आई त्याला आपण सांभाळण्याचे बिल मागते. तेव्हा मात्र त्याचे डोळे भरून येतात. या उदाहरणाने उपस्थित महिलांचे डोळे पाणावले.


..आणि पहिल्यांदा भिंतीचा रंग पाहिला
अरुणा ढेरे यांचे वडील साहित्यिक होते. त्यांच्या घरात भिंती लपतील एवढय़ा संख्येने पुस्तके होती. त्यामुळे बालपण गेले तरी अरुणा ढेरेंना आपल्या घराच्या भिंतीचा रंग कोणता हे ठावूक नव्हते. वयाच्या 25 व्या वर्षी घर रिकामे करताना त्यांना आपल्या घराच्या भिंतींचा रंग पाहावयास मिळाला. खूप वाचनानेच आपण अनुभवी बनलो, असे ढेरे यांनी व्याख्यानाप्रसंगी सांगितले.