आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरामणी विमानतळाच्या भूसंपादनास शेतकरी राजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - बोरामणी विमानतळासाठी तिसर्‍या टप्प्यातील भूसंपादनास शेतकर्‍यांनी विरोध सुरू केला होता. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी जमिनीस योग्य भाव देण्याचे ठोस आश्वासन दिल्याने संयुक्त मोजणीस सोमवारी शेतकरी राजी झाले. मोजणीही सुरू झाली. दोन दिवसांत संपादनाची प्रक्रिया राबवण्यात येईल.
नियोजित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तिसर्‍या टप्प्यात 28 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. रविवारी प्रत्यक्ष संपादित केल्या जाणार्‍या जमिनीची जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केली. सर्व शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला देताना कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. पुनर्वसनाचे चांगले पॅकेज देण्याचे ठोस आश्वासन आपण दिले. या आश्वासनानंतर शेतकर्‍यांनी जमिनी देण्याचे मान्य केले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी सांगितले.
या वेळी विमानतळाचे अधिकारी सज्जन निचळ, प्रांताधिकारी र्शीमंत पाटोळे, भूसंपादन अधिकारी मारुती बोरकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे व शेतकरी उपस्थित होते.


ठोस आश्वासन दिल्याने तयार झालो
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी शेतकर्‍यांना जमिनीचा अधिकाधिक मोबदला देण्यासाठी स्वत: प्रयत्न करू असे आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी जमीन देण्यास तयार झालो. भारत कवडे, शेतकरी.