आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Competition For Solapur Lok Sabha Seat

निवडणुकीचा आखाडा: सोलापूर लोकसभेसाठी चौरंगी लढतीची चिन्हे; ‘आप’चीही घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर लोकसभा निवडणुकीत या वेळी काँग्रसचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे विरुद्ध भाजपचे शरद बनसोडे असा सामना राजकीय रणांगणावर पहायला मिळण्याची चिन्हे आहेत. तर आम आदमी पार्टीही निवडणूक रिंगणात उतरली असून सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर यांचे नाव निश्चित झाले आहे. बसपासह तिसर्‍या आघाडीच्या उमेदवारामुळे चौरंगी लढत अटळ आहे.


येत्या पंधरवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल असे मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसने सोलापूर हा आपला पारंपरिक मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच शिंदे यांनी तालुकानिहाय मेळावे घेऊन व विविध समाजांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.


इकडे आम आदमी पार्टीने मूळचे सांगोल्यातील असलेले ललित बाबर यांचे नाव निश्चित केले आहे. आज पक्षाने दुसरी यादी जाहीर केली. त्यात बाबर यांचे नाव आहे. बाबर यांचा सोलापुरात फारसा संपर्क नाही, त्यामुळे प्रचारात खूपच मेहनत घ्यावी लागेल, अशा प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गायकवाड यांचे नाव चर्चेत होते, पण त्यांनी असर्मथता दर्शवली. बहुजन समाज पार्टी आणि तिसरी आघाडी यांच्यात कोणता निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे. तिसर्‍या आघाडीचा मेळ अजूनतरी बसलेला नाही.


भाजपात अजूनही संभ्रम
गेल्या महिन्यापासून शिंदेंचे दौरे वाढले आहेत. विरोधी पक्षात मात्र अजून शांतताच आहे. विरोधी पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्याची चर्चा सुरू आहे. गेल्यावेळी शिंदे यांच्या विरोधात टक्कर देणार्‍या शरद बनसोडे यांनाच यावेळीही मैदानात उतरवण्याचे भाजपने ठरवल्याचे समजते. उमेदवारीबाबत भाजपमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे.


.. तर लढणार
येत्या एक-दोन आठवड्यांत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची घोषणा होईल. मी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. मी लढणार नाही असे जाहीर केले होते, पण पक्षाकडे उमेदवारच नसल्याने माझ्याकडे विचारणा झाली. पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर माझी चर्चा झाली आहे. उमेदवारी दिली तर निवडणूक लढवू. शरद बनसोडे, भाजपा


दमानिया येणार
आम आदमी पार्टीकडून ललित बाबर यांचे नाव जाहीर झाले आहे. पक्षाच्या तयारीसाठी पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया येत्या मंगळवारी सोलापूर दौर्‍यावर येणार आहेत. त्यांच्या दौर्‍याचा कार्यक्रम एक , दोन दिवसांत स्पष्ट होईल. आम आदमी पार्टी सोलापुरातून निवडणूक लढवणार आहे. मकरंद चनमल, समन्वयक , आम आदमी पार्टी


शिंदे हेच उमेदवार
काँग्रेसची यादी दोन दिवसांत जाहीर होईल. सोलापुरातून गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव निश्चित आहे. विरोधी पक्षाकडून कोणीही उमेद्वार असो, फरक पडणार नाही. गेल्या महिन्यापासून काँग्रेसचे कार्यक्रम सुरू आहेत, ते मतदानापर्यंत चालू राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसही सोबत आहे. बाळासाहेब शेळके, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस


दिवसांत निर्णय
अँड. बनसोडे, उत्तम जानकर, डॉ. सुरेश कोरे, अशोक कटके, संजय क्षीरसागर हे इच्छूक आहेत. त्यांची नावे वरिष्ठांकडे पाठवली आहेत. येत्या दोन, चार दिवसांत उमेदवारीबाबत निर्णय होईल. बनसोडे यांच्या उमेदवारी निश्चितीबाबत आपल्याला माहिती नाही. उत्तम जानकर यांचे नाव आले तर ते भाजपच्या चिन्हावर लढतील. विजयकुमार देशमुख, आमदार, शहराध्यक्ष, भाजप