आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Congress, BJP, Divya Marathi, Lok Sabha Election

रणधुमाळीसाठी ‘कॉंग्रेस आणि भाजप रथ’सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे विशेष रथ सज्ज झाले आहेत. काँग्रेसने शहरात केलेल्या विकासकामांची यादीच या रथाद्वारे सोलापूरकरांसमोर मांडली आहे. तर भाजपने त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसच्या राजवटीवर टीकाटीप्पणी करणारा मजकूर टाकला आहे. काँग्रेसने जवळपास गेल्या दीड महिन्यापासून रथ तयार केलेला आहे, तर भारतीय जनता पक्षाचा रथ बुधवारी तयार झाला. हे दोन्ही रथ शहरातून दौडणार आहेत. मात्र आरटीओच्या परवानगीसाठी दौड थांबली आहे.


काँग्रेसचा ‘संकल्प रथ’
सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी ‘संकल्प रथ’ तयार करण्यात आला. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील प्रचारासाठी तो रथ फिरणार आहे.
गृहमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यात मंजूर केलेले विकासाचे प्रकल्प, नवीन योजनांची सचित्र माहिती त्यावर आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परवाना मिळवण्यासाठी हा बुधवारी दिवसभर थांबून होता. सायंकाळी त्यास परवाना मिळाल्यानंतर तो पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. या रथावर विविध विकासकामांची माहिती देण्यात आली आहे.
व्यर्थ ना हो बलिदान!
रथाच्या दर्शनीभागावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे मोठे छायाचित्र आहे. त्या शेजारीच शिंदेंचे छायाचित्र आहे. त्यावर ‘जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार’ असा उल्लेख आहे. एका बाजूला ‘व्यर्थ ना हो बलिदान’ या ओळीखाली महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची छायाचित्रे आहेत. दुसर्‍या बाजूला आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक, विष्णूपंत कोठे व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांचे छायाचित्र आहे, पाठीमागील बाजूस विविध विकासकामांची छायाचित्रे आहेत.