आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Congress, Lok Sabha Election, Divya Marathi

निवडणुकीचा आखाडा: काँग्रेसच्या प्रचारासाठी राज्यातीलच फौज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांच्याच पक्षातील एकही राष्ट्रीय नेता किंवा स्टार प्रचारक येणार नाही. राज्यातीलच काँग्रेस नेत्यांसह, कर्नाटकातील काँग्रेसचे मंत्री प्रचारासाठी येणार आहेत.


गृहमंत्री शिंदे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीतच प्रचाराचा प्रारंभ झाला. महाराष्ट्रासह देशात विविध ठिकाणी शिंदे प्रचारसभांसाठी जाणार आहेत. त्यांच्याच मतदार संघातील प्रचाराची जबाबदारी राज्यातील नेत्यांवर आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील एकही स्टार प्रचारक येणार नाही. चित्रपट व नाट्य क्षेत्रातील आघाडीचे कलावंत प्रचारासाठी येण्याची शक्यता नाही. त्याऐवजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जाहीर सभा दक्षिण सोलापूर, मंगळवेढा- पंढरपूर भागांमध्ये होणार आहेत. दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील कन्नड भाषिकांची संख्या असल्याने विजापूरचे पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्या जाहीर सभा दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे व औराद येथे होणार आहे.


शिंदे हेच स्टार प्रचारक
गृहमंत्री शिंदे हे राष्ट्रीय पातळीवरचे स्टार प्रचारक आहेत. जिल्ह्यात पक्षाचे वर्चस्व असल्याने बाहेरच्या मोठय़ा प्रचारकांची फारशी आवश्यकता नाही. राज्यस्तरीय नेत्यांबरोबर कर्नाटकातील मंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. बाळासाहेब शेळके, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस