आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विहिरीत क्रेन कोसळून सात मजूर ढिगा-याखाली दबले; एकाचा मृत्यू, तर उर्वरित लोकांचा शोध सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला - वाढेगावच्या नदीपात्राजवळील 40 फूट कोरड्या विहिरीत शुक्रवारी दुपारी क्रेनसह मातीचा ढिगारा कोसळून चालकासह सात मजूर गाडले गेले. क्रेनच्या साहाय्याने विहिरीत सिमेंटची रिंग टाकण्याचे काम सुरू होते. विहिरीच्या तळाशी बसवलेली रिंग अचानक तुटली. त्यामुळे क्रेन आणि बाजूचा ढिगारा कोसळला. क्रेनचालकासह मजूर गाडले गेले. क्रेन चालकाचा मृतदेह सायंकाळी बाहेर काढण्यात आला. उर्वरित लोकांचा रात्रभर शोध सुरू होता.

माण नदीकाठावर मधुकर व परमेश्वर बजरंग दिघे यांची विहीर आहे. महिनाभरापासून विहिरीचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमाराला क्रेनच्या साहाय्याने विहिरीत खाली सिमेंट रिंग सोडली जात होती. यादरम्यान अचानक तळाशी बसवलेली रिंग तुटली. त्यामुळे क्रेनखालील माती आणि वाळूचा पाया ढासळला. क्रेन चालकासह खाली असलेल्या मजुरांच्या अंगावर पडली. त्यानंतर माती व वाळूही ढासळली. त्यामुळे सर्वजण गाडले गेले. पोकलेनच्या साहाय्याने सायंकाळी पाच वाजता क्रेनचालक अंकुश रोडगे याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.