आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीएसआयएफ’च्या जमिनीचा आज निर्णय होण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मुस्ती (दक्षिण सोलापूर) येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल बटालियनसाठी लागणार्‍या जमिनीच्या दराविषयी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. शेतकर्‍यांनी जिरायत जमिनीसाठी एकरी 15 लाख तर बागायत जमिनीसाठी 20 लाख रुपयांची मागणी केली होती. सीएसआयएफचे अधिकारी एकरी नऊ लाख रुपये देण्यास राजी झाले. मात्र शेतकरी 14 लाखांवर अडून बसले आहेत. शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून अंतिम दर ठरवण्याविषयी पुन्हा मंगळवारी बैठक होणार आहे.


जमिनीचा अंतिम दर निश्चित केला जाणार आहे. बैठकीला सीएसआयएफचे अधिकारी, प्रांताधिकारी र्शीमंत पाटोळे, तहसीलदार कुणाल खेमनार व शेतकरी उपस्थित होते. दर जास्त असल्याने बागायती जमीन प्रशिक्षण केंद्रासाठी घेतली जाणार नसल्याचे समजते.