आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Divya Marathi, Lok Sabha Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धास्तावलेल्या काँग्रेसचा ४२ नगरसेवकांना ‘व्हीप’; बैठकीत वदवून चित्रीकरणही केले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लोकसभा निवडणुकीतील पराभव, आगामी विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर महापालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. कोठे यांच्या नव्या राजकीय खेळीमुळे धास्तावलेल्या काँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान नगरसेवकांत फाटाफूट होऊ नये म्हणून सोमवारी काँग्रेसच्या ४२ नगरसेवकांना ह्यव्हीपह्ण बजावला. दुसरीकडे महापालिकेतही सत्तांतर करू असा दावा करणारे महायुतीचे नेते शांतच दिसत होते. मंगळवारी सकाळी महायुतीची रणनिती ठरणार आहे.

महापौर आिण उपमहापौर पदासाठी सप्टेंबरला निवडणूक होत आहे. यासाठी मंगळवारी अर्ज दाखल करायचे आहेत. महापािलकेवर काँग्रेस आिण राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व असले तरी काँग्रेसला लोकसभा िनवडणुकीत मोठा दणका बसला आहे. लोकसभा िनवडणुकीनंतर काँग्रेसला िखंडार पडले आहे. महापािलकेवर वर्चस्व ठेवून असलेल्या महेश कोठे यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन िशवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तेची समीकरणे बदलतील, अशी अपेक्षा आहे.

यापार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हण्ून काँग्रेसने नगरसेवकांची बैठकीत घेतली. तीत ४२ नगरसेवकांना व्हीप काढण्यात आला आिण सर्वांनी तो स्वीकारला. विशेष म्हणजे व्हीप आणि बैठकीचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. महापौर पदासाठी श्रेष्ठींकडून जे नाव येईल त्यांनाच आम्ही मतदान करू असेही नगरसेवकांकडून वदवून घेण्यात आले. दरम्यान, महापौर पदासाठी काँग्रेस श्रेष्ठींकडून कोणाचे नाव जाहीर होते याबद्दलही उत्सुकता आहे.

काय करणार कोठे
महेश कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महापालिकेत सत्तांतर होईल असा विश्वास महायुतीने व्यक्त केला होता. कोठे यांच्याबरोबर काही नगरसेवकही आहेत, असे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात एकही विद्यमान नगरसेवक अधिकृतपणे कोठे यांच्यासोबत सेनेत जावू शकला नाही. आपले सदस्यत्व शाबूत ठेवण्यासाठी कोठे समर्थक असूनही काही नगरसेवकांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले आहे. त्यातीलही काही नगरसेवकांनी आज काँग्रेसचा व्हीप स्वीकारला. त्यामुळे ते काँग्रेससोबत राहतील का? याचीही उत्सुकता आहे. काही नगरसेवक गैरहजर ठेवण्याची कोठे यांची खेळी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे, त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ महापौरपदापर्यंत टिकून राहते का? याची उत्सुकता लागून राहीली आहे.

उपमहापौर पदासाठी डोंगरेंची चर्चा
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उपमहापौर पदासाठी स्पर्धा लागली आहे. हे पद शहर मध्यमध्ये ठेवायचे की शहर उत्तरसाठी? या बाबतचा कल समोर ठेवूनच उपमहापौर पदाचे नाव निश्चित केले जाईल, असे पक्षातून सांगितले जात आहे. मात्र सध्यातरी प्रवीण डोंगरे यांचे नाव आघाडीवर आहे. उद्या सकाळी उपमहापौर पदासाठीचेही नाव जाहीर केले जाणार आहे.

युतीचीआज बैठक
महापौरपदाच्यािनवडणुकीत युतीचाही उमेदवार राहील. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. युतीकडून अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी सकाळी वाजता समन्वय समितीची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यात नावे नििश्चत करून अर्ज दाखल केले जातील.
वजियकुमार देशमुख, भाजप, शहराध्यक्ष

गदलवालकर भरणार?
महापौरसाठी भाजपकडून नरसूबाई गदवालकर यांचा अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे, तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

आबुटे, फुलारे, म्हेत्रे चर्चेत
दरम्यान,पक्षातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगरसेविका सुशीला आबुटे यांना महापौरपदाची संधी देण्याचे निश्चित मानले जात आहे. श्रीदेवी फुलारे आणि अनिता म्हेत्रे यांचीही नावे चर्चेत आहेत. महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. त्यापूर्वी श्रेष्ठींकडून नाव जाहीर होईल.