आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या भांडणाला कंटाळून आईने दीड महिन्याच्या मुलाला 10 हजारांत विकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दीड महिन्याच्या पोटच्या लेकराला आईने 10 हजार रुपयांना विकल्याची घटना भगवाननगर झोपडपट्टीत घडली. याबाबत पतीने जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलाची आई सविता बंडू कांबळे आणि विकत घेणार्‍या हसीना आदम फुलारी यांच्या विरोधात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : बंडू नरसिंग कांबळे आणि सविता कांबळे हे दांपत्य पोलिस मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या भगवाननगर झोपडपट्टीत राहतात. त्यांच्यात नेहमी भांडणे होतात. मुलगा झाला तरी नवरा भांडतो म्हणून सविता कांबळे यांनी दीड महिन्याच्या पोटच्या चिमुकल्याला शास्त्रीनगरात राहणार्‍या हसीना आदम फुलारी यांना विकून टाकले. हा प्रकार लक्षात आल्याने पती बंडू कांबळे यांनी जेलरोड पोलिसांत धाव घेतली.
त्यांची तक्रार ऐकून पोलिसही चक्रावून गेले. सविता कांबळे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर नवर्‍याच्या भांडणाला कंटाळून मुलाला विकल्याची कबुली त्यांनी दिली.

बालहक्क कायद्यानुसार गुन्हा
पोलिसांनी बालहक्क कायद्यानुसार रात्री 12 वाजता गुन्हा दाखल केला. जन्मलेल्या मुलाची काळजी घेतली नाही. त्याच्या पालन-पोषणाची जबाबदारी नाकारली, असे या कायद्याचे स्वरूप आहे. अधिक तपास जेलरोड पोलिस करत आहेत.