आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Divya Marathi, Political Leader

‘राजाश्रया’खाली होत्या अनधिकृत दगडखाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यातील 232 पैकी 156 खाणी या अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. खाणचालकांची यादी पाहिल्यानंतर यामध्ये 50 टक्केपेक्षा अधिक खाणी या राजकीय नेत्यांच्या असल्याचे उघड झाले आहे. अनधिकृत खाणचालकांमध्ये माजी महापौर महेश कोठे, कंत्राटदार समाधान आवताडे, शरणबसप्पा वाले, नगरसेवक प्रवीण डोंगरे, शंकर चौगुले, सतीश भीमराव बिराजदार, अनिल गोरे यांच्यासह अनेक बड्या हस्तींचा यामध्ये समावेश आहे. राजकीय वरदहस्त असल्याने आतापर्यंत एकाही अधिकार्‍यांनी कारवाईचे धाडस दाखवले नसल्याने विनापरवाना दगडखाणी सुरू होत्या. सर्वच खाणींच्या मोजणीनंतर 232 आकडा समोर येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामध्ये गौण खनिज विभागाने 156 खाणी अनधिकृत असल्याचे अधिकृत जाहीर केल्यानंतर अखेर या खाणी कोणाच्या आहेत? हा प्रo्न सोलापूरकरांना पडला होता. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी संबंधित खाणचालकांना नोटिसा पाठवून रॉयल्टी व दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. संबंधितांकडून दंड वसुली केली जाईल, असे महसूल उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांच्या निशाण्यावर राजकीय धेंडे
दक्षिण सोलापूर - लक्ष्मीकांत रमेश गादेकर व प्रवीण गुंडूराव डोंगरे (धोत्री), गंगेवाडी - शंकर सोमण्णा चौगुले, सिद्धेश्वर परमेश्वर काळे, महेश कोठे (गंगेवाडी),शरणबसप्पा संगप्पा वाले आणि सविता आनंद सुरवसे, सुभाषचंद्र मुलगे आणि चिदानंद सुरवसे (नांदणी), अनिल गोरे आणि सुनील परदेशी (टाकळी).
उत्तर सोलापूर - शेळगी - अमोल सुभाष इरकल, श्रीकृष्ण शिवराम मंठाळकर, सूर्यकांत मंठाळकर, मनोहर शंकरराव मुधोळकर, विमल अरुण चौगुले, अनिल बाबूराव धोत्रे, लक्ष्मण रमेश चौगुले, समाधान महादेव आवताडे, चिदानंद गुंडिबा मंठाळकर, राजू दत्तात्रय बंदपटे, सतीश भीमराव बिराजदार, इतर 21 जण.
अक्कलकोट - सुनील गोरे, एल.एस. जमादार, हरिकृष्ण पुलगम यांच्यासह इतर 3. करमाळा - अनिल महाजन व संगीता राहुल शहा.
बाश्री - शहाजी बघाडे, श्रीराम गुंडे, जयसिंग परदेशी, सुनील चौगुले, अमोल चव्हाण, अप्पासाहेब शेंडगे यांच्यासह इतर 13 जण. मंगळवेढा - समाधान महादेव आवताडे, तानाजी अंबादास जाधव, भीमा मुदगल आणि इतर 39.
सांगोला - बाळासाहेब पाटील, प्रकाश पाटील, सुमन काटे, सतीश सूर्यवंशी.
माढा - मनीष कृष्णलाल वोरा, सुनील पाटील, बाळासाहेब देशमुख व रामचंद्र कोठारी, लक्ष्मण मारुती गवळी.
पंढरपूर - धर्मराज घोडके, संजय बागल, यू.पी. बागल, अरुण पाटील, संजय साठे इतर 9 जण. मोहोळ - प्रतिभा गरड, हरिश्चंद्र पवार, मल्लिनाथ पाटील, संजय पाटील, रघुनाथ बाळू होनराव.
माळशिरस - धनंजय हिवरकर, रवींद्र घोरपडे, राजेंद्र सरगर, सुभाष शिंदे आणि संजय मोरे, जगन्नाथ पालवे सह इतर 6