आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Divya Marathi, Social Media

सोलापुरात अफवांचे पीक; बाजारपेठा कडकडीत बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोशल मीडियात रविवारी अफवांना पेव फुटले. महापुरुषांच्या विटंबनेच्या वार्तेने सकाळपासूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले. नऊनंतर व्यापार्‍यांनी दुकाने पटापट बंद केली. एसटीला जबरदस्त फटका बसला. बार्शी, कुडरुवाडीसह सोलापूर शहरातही काही ठिकाणी किरकोळ दगडफेक झाली. हुल्लडबाजी करणार्‍या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही घटना नेमकी कुठे घडली किंवा नक्की घडली की नाही, हेही कळत नव्हते. कुडरुवाडी, कोल्हापूर, कल्याण-मुंबई अशी वेगवेगळ्या शहरांची नावे येऊ लागली. सोशल मीडियावर हा प्रकार घडल्याचेही सांगितले जात होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. नवी पेठ, पार्क चौक , जुना एम्प्लॉयमेंट चौक , जुळे सोलापूरचा काही भाग, विजापूर रोड, मधला मारुती, टिळक चौक , सम्राट चौक परिसरातील उर्वरित पान 10
सर्व व्यवहार ठप्प झाले. पांजरापोळ चौकातही असेच वातावरण होते. रस्त्यावरील वाहतूक चालू होती. काही ठिकाणी लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमही सुरळीत पार पडले.
पार्क चौकात एका टोळक्याने सह्याद्री हॉटेलशेजारच्या पाणपट्टीवर विटा फेकल्या. काहीनी मेकॅनिक चौकातील दुकानांसमोर गोंधळ घातला. पोलिसांनी सार्‍यांना चांगलाच चोप दिला. भय्या चौक , रामलाल चौक , जुना देगाव नाका या ठिकाणीही किरकोळ दगडफेक झाली. दरम्यान, बसपने आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी बसपचे जिल्हाध्यक्ष संजीव सदाफुले, नगरसेवक आनंद चंदनशिवे, बबलू गायकवाड उपस्थित होते. शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनीही पार्क चौकात येऊन परिस्थितीची माहिती घेतली.
मजकूर खोटा, माहिती चुकीची
सोशल मीडियातील मजकूर खरा असतोच असे नाही. फेसबुक, व्हॉट्सअँपच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात आहे. लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
भय इथले संपत नाही..
0पंढरपुरात मोर्चा; दुकाने, पोलिस, प्रांताधिकार्‍यांच्या वाहनांवर दगडफेक
0कुडरुवाडीत बस जाळण्याचा प्रकार, काही काळ तणाव
0मंगळवेढय़ात जमावाकडून डेपोत घुसून 25 बसेसचे नुकसान
0कर्नाटकातून सोलापूरला येणारी वाहने टाकळी, तेरामैलहूनच परत फिरली
0करमाळ्यात बंद, निषेध रॅली; मोहोळमध्ये आठवडी बाजार भरलाच नाही. लोक घरीच.