आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Driving Licence, Agent, Divya Marathi

अवघ्या 15 मिनिटांत मिळेल आता शिकाऊ वाहन परवाना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - परवाना मिळविण्यासाठी मारावे लागणार्‍या चकरा, एजंटांची चालणारी मक्तेदारी आणि प्रत्येक कामासाठी पैसा व वेळ खर्च करणे म्हणजे आरटीओचे कार्यालय अशीच प्रतिमा बहुतेकांच्या मनात असते. यापुढे ही प्रतिमा पुसली जाणार असे दिसते.


कारण सोलापूर उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी अथवा चारचाकीचे वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना तुम्हाला अवघ्या 15 मिनिटांत मिळणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला स्क्रीन टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यात उत्तीर्ण झाल्यावर लागलीच तुमच्या हातात वाहन चालवण्याचा परवाना पडणार आहे.


हैदराबदेतील राष्ट्रीय विज्ञान माहिती केंद्राने स्क्रीन टेस्टएड फॉर लर्नर लायसन (स्टाल) ही यंत्रणा विकसित केली आहे. सोलापूर तसेच राज्यातील अन्य 22 आरटीओ कार्यालयात ही यंत्रणा आठवड्याभरात कार्यान्वयीत होईल. यासाठी सध्या कर्मचार्‍यांना बारामती येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे.


अशी असेल स्क्रीन टेस्ट
परवाना मिळवण्यासाठी 15 गुणांची स्क्रीन टेस्ट द्यावी लागेल. मराठी, हिंदी, इग्रंजी या तिन्ही भाषांचा पर्याय असेल. निवडलेल्या भाषेत स्क्रीनवर प्रश्न विचारण्यात येईल. उत्तराचे चार पर्याय असतील. बरोबर पर्यायावर क्लिक केल्यानंतर करा. 15 पैकी 9 उत्तर बरोबर आल्यास परीक्षेत पास समजले जाईल व संबंधितना वाहन परवाना दिला जाईल.


नापासांना पास होईपर्यंत संधी
ही परीक्षा देण्यासाठी 30 रुपयांचे शुल्क असेल. शुल्क भरल्यानंतर वाहनधारकांची कागदपत्रे तपासण्यात येईल. त्यानंतर विशेष परिक्षा हॉल येथे परीक्षा असेल. या परीक्षेत नापास झालेल्यांना दुसर्‍या दिवशी परीक्षा देता येईल. त्यासाठी पुन्हा शुल्क भरण्याची व कागदपत्रे तपासण्याची गरज नाही. त्यामुळे वाहनधारक पास होईपर्यंत परीक्षा देता येईल.


20 संगणकांची सोय
स्क्रीन टेस्ट देण्यासाठी सोलापूर कार्यालयात 20 संगणक उपलब्ध करण्यात आली आहेत. या संगणकांवर टेस्ट द्यावी लागेल. लवकरच या संदर्भातले संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. यावरूनही परवान्यासाठी अर्ज दाखल करणे शक्य होणार आहे.’’ दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी