आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Fashion Trend, Style, Divya Marathi

फॅशन झोलाछाप बॅगची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - टाइमपास, दुनियादारी, बालक-पालक या चित्रपटाच्या निमित्ताने आलेल्या युवतींच्या फॅशन ट्रेंडमध्ये पुन्हा जुन्या स्टाइलचा ट्रेंड बहरला आहे. त्यामध्ये झोलाछाप बॅगच्या ट्रेंडचा बहर आता मोठय़ा प्रमाणावर फुलला आहे. सोलापूरच्या युवतींचा त्याकडे अधिक कल असल्याचे दिसून येते.
कॉटन बॅगना अधिक मागणी
साध्या कॉटनच्या मलमली झोल्याला आणि लांब बंदाच्या झोला बॅगला सध्या खूप मागणी आहे. मोठे बंद रंगीत मिक्स काम केलेल्या बॅग, कापडी तुकड्यांचे कॉम्बिनेशन असलेल्या बॅग, वर्क केलेल्या बॅग यामध्ये केवळ कॉटनच्याच कापडाला अधिक मागणी असल्याचे दिसून येते.
जरी कॉम्बिनेशनला मागणी
पैठणी गढवाल, ओरिसा सिल्क व विविध प्रकारच्या सिल्कच्या साड्यांच्या काठांना एकत्र चिकटवून त्यांचे गोल, चौकोन, त्रिकोण, विसंगत आणि विविध प्रकारच्या नक्षीचे प्रकार यात उपलब्ध आहेत. त्यात गडद जांभळा, हिरवा, पिवळा, नारंगी, काळा, पांढरा आणि लाल रंगांना अधिक मागणी आहे.
डेकोरेटिव्हची गर्दी
डेकोरेटिव्हमध्ये कुंदन वर्क आणि विविध प्रकारच्या मॅनॉर्स वर्क, मेटल स्टोन, मोठे पदक, दोरी काम केलेल्या डिझाइनलाही खूप मागणी आहे. त्यात महागड्या बॅगमध्ये पूर्णपणे मण्यांचे काम केलेल्या बॅगना अधिक मागणी आहे.
उत्तम पर्याय आहे
हा ट्रेंड आता वाढला आहे. लूकने रिच आणि स्वस्त, शिवाय वजनाला हलकी असलेली ही बॅग वापरण्यासाठी सुसह्य आहे. नव्या- जुन्या ट्रेंडमध्ये मोठय़ा प्रमाणावर डिझाइन्स असल्याने चॉइसलाही पर्याय आहे. त्यामुळेच सध्या याचा ट्रेंड भरपूर सुरू आहे.’’ आरती जाधव, शिक्षिका
दिवस व पोषाखानुसार बदल
झोला बॅग 100 ते 120 रुपयांच्या लेदरच्या तुलनेने कमी किमतीच्या असल्याने युवती जीन्सवर वेगळी, पंजाबी ड्रेसवर वेगळी तर वेगवेगळ्या ड्रेसच्या कार्यक्रमाच्या सेन्सनुसार या बॅग यूज करण्यामध्ये बदल करतात. वर्किंग वुमनच्या बाबतीत मात्र त्यांना आकाराने मोठय़ा व सहज घरच्या घरी वॉशेबल असल्याने उत्तम पर्याय असल्याने त्यांचाही याकडे अधिक कल आहे. थोड्या रक मेत तीन ते चार बॅगच्या व्हरायटी मिळत असल्याने महिलांनाही ते उपयुक्त ठरत आहे.