आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Gulbarga Railway Division, Divya Marathi

गुलबर्गा रेल्वे विभागाची निर्मिती होणे आता अटळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामवाडी मालधक्क्याची मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक सूद यांनी पाहणी केली. - Divya Marathi
रामवाडी मालधक्क्याची मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक सूद यांनी पाहणी केली.

सोलापूर - सोलापूर रेल्वे विभागाचे 40 किलोमीटरचे अंतर तोडून ते गुलबर्गा रेल्वे विभागाला जोडले जाणार आहे. नवीन गुलबर्गा विभागात 450 किलोमीटर अंतरचा भाग समाविष्ट असणार आहे. अशा प्रकारे गुलबर्गा विभागाची निर्मिती करून तो दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये समाविष्ट केला जाणार असल्याचे मध्य रेल्वे सरव्यवस्थापक एस. के. सूद यांनी मंगळवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत सांगितले.


एस. के. सूद हे सोलापूर रेल्वे स्थानकाची वार्षिक पाहणी करण्यासाठी आले होते. वाडी रेल्वे स्थानकावरून ते विशेष रेल्वेने सोलापुरात दुपारी 4.50 वाजता दाखल झाले. रामवाडी मालधक्क्याची व त्यानंतर स्थानकामधील रनिंग रूमची पाहणी केली. सायंकाळी रेल्वे हॉस्पिटल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गुलबर्गा विभाग करताना गुलबर्गा ते वाडी हा 40 किमीचा भाग सोलापूरपासून तोडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुलबर्गा विभागाची निर्मिती गुलबर्गा ते वाडी व वाडी ते हसन असे जवळपास 400 किमीचे अंतर गुलबर्गा विभागाच्या अंतर्गत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवीन विभाग हा दक्षिण-पश्चिम रेल्वेशी जोडून त्याचे मुख्यालय हुबळी असेल असे त्यांनी यावेळी सांगितले.


सोलापूर ते भिगवण व होटगी ते गुलबर्गा दरम्यान रेल्वे रुळाचे दुहेरीकरणाचे काम चालू असून 2015 अखेर ते काम पूर्ण होणार आहे. रेल्वे रुळाचे दुहेरीकरण झाल्यानंतर या मार्गावरून नवीन गाड्या धावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निधीअभावी सोलापूर रेल्वे स्थानकाचा मास्टर प्लॅन हा धूळखात आहे. रेल्वे प्रशासन सोलापूर स्थानकासाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेस मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक एम. ए. कांबळे, सोलापूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस, वरिष्ठ विभागीय दळणवळण व्यवस्थापक सुशील गायकवाड, मुख्य अभियंता ए. के. मित्तल आदी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


आता कॅम्पस इंटरव्यूव्हमधून करण्यात येणार डॉक्टरांची भरती
रेल्वेमध्ये डॉक्टरांची वानवा आहे. यापुढे रेल्वे प्रशासन डॉक्टरांचे पद भरताना प्रख्यात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे कॅम्पस सिलेक्शन करणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे सूद म्हणाले.