आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Home Minister Sushilkumar Shinde

शिवराय सर्वधर्मसमभावाचे प्रतीक - सुशीलकुमार शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आमचा इतिहास हिंदू-मुस्लिम संघर्ष सांगतो. शिवाजी महाराजांची बदनामीही करतो. तुम्ही संशोधन करा. इतिहासाचा अन्वयार्थ लावून घ्या. शिवाजी महाराज केवळ हिंदूहृदयसम्राट नव्हते तर सर्वधर्म समभावाचे प्रतीक होते हे समजून घ्या, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी येथे केले. मुसा अहमद खान यांचे पुस्तक ‘दिलोंको जोडने का काम करेल’, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.


माजी पोलिस उपअधिक्षक खान यांनी लिहिलेल्या ‘शिवछत्रपतींची धर्मनिरपेक्षता’ पुस्तकाचे उर्दू भाषांतर
‘छत्रपती शिवाजी महाराज की मजहबी रवादारी’चे प्रकाशन र्शी. शिंदे यांच्या हस्ते झाले. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कॉम्रेड एन. आर. बेरिया मेमोरियल ट्रस्ट, राज्य उर्दू अकादमी यांच्या वतीने हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी अकादमीचे कार्याध्यक्ष मोहमंद खुर्शीद सिद्दिकी होते. मंचावर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, उर्दू अभ्यासक राजेंद्र जोशी, विष्णुपंत कोठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एन.एन. मालदार, माजी खासदार धर्मण्णा सादूल, अँड. यू. एन. बेरिया, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अँड. समीर बेरिया यांनी केले. सूत्रसंचालन विकार शेख यांनी केले.
बेरियांचे कौतुक : अँड. यू. एन. बेरिया हे माझे विश्वासू सहकारी आहेत. त्यांच्यावरील र्मजी कमी झालेली नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.


सोलापूर विद्यापीठात उर्दू विभाग : अध्यक्षीय भाषणात मोहमंद खुर्शीद म्हणाले, ‘‘मुसा खान यांचे पुस्तक समस्त जातीयवादी शक्तींना चपराक आहे. उर्दू आणि मराठीला जवळ आणण्याच्या चळवळीत सोलापूरचे मोठे योगदान आहे. कुलगुरू डॉ. मालदार यांनी सोलापूर विद्यापीठात उर्दूचा एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचे आश्वासनही दिल्याचेही त्यांनी सांगितले.


रोशनी मिलेगी : पुण्यातील उर्दू अभ्यासक राजेंद्र जोशी यांनी फारशीतून भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. उर्दू अकादमीने माझ्याकडे मुसा खान यांचे पुस्तक पाठविताना कोणत्याही प्रकारचा वाद विवाद होऊ नये ही काळजी घेण्यासाठी पाठवले होते. पुस्तकातील संदर्भ खूप चांगले आहेत. यातून तुम्हाला एक प्रकारची रोशनी मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.


यशवंतरावांची प्रेरणा : लेखक मुसा खान म्हणाले, ‘‘6 वीत असताना मी यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणातून रत्नागिरी जिल्ह्यातील एका मुस्लिम संताला शिवाजी महाराज गुरुस्थानी मानायाचे, हा संदर्भ ऐकला होता. यातून माझ्या मनात उत्सुकता वाढली. चिकित्सक दृष्टिकोनातूनच शिवराय हे माझ्या अभ्यासाचा विषय बनले. आता हे पुस्तक साकारले.’’


दिलोंको जोडनेवाली किताब : शिंदे म्हणाले, ‘‘देशात आज जातीय दंगली पेटविणार्‍या प्रवृत्ती जोर धरत आहेत. अशा वेळी एक अल्पसंख्याक माणूस आपल्या पुस्तकातून मने जोडण्याचे काम करीत आहे. आम्ही केवळ शिवाजी महाराजांच्या बिछायतीवर चादर टाकणार्‍या मदारी मेहतरचे नाव ऐकले होते. मुसा खान यांनी खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’’


जब चली गोरी पियासे मिलने.. : शिंदेंनी हिंदीतून खुमासदार भाषण केले. बदलत्या परिस्थितीचे संदर्भ देताना त्यांनी आपण कव्वाली ऐकण्यासाठीही जात असल्याचे सांगितले. ‘इक वो दिन थे, जब चली गोरी पियासे मिलने. ये सुनने जाते थे, आज ऐसे दिन है कही गोरी को नुकसान न हो ये देखना पडता है।’