आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Kurla Nanded Express, Railway, Divya Marathi

कुर्डुवाडीमार्गे धावणार नवी कुर्ला-नांदेड एक्स्प्रेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या वतीने कुर्ला (लोकमान्य टिळक टर्मिनल) ते नांदेड विशेष साप्ताहिक रेल्वे 12 मार्चपासून सुरू होत आहे. कुर्डुवाडीमार्गे धावणार्‍या या नव्या गाडीमुळे सोलापूरसह जिल्ह्यातील प्रवाशांना थेट नांदेडला जाणे सोयीचे होणार आहे.


कुर्ला रेल्वे स्थानकावरून ही गाडी दर बुधवारी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी निघेल. कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल. 10 मिनिटांचा थांबा घेऊन गाडी पुन्हा मार्गस्थ होईल. नांदेडला पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. नांदेड स्थानकावरून ही गाडी दर गुरुवारी सकाळी 6.30 वाजता निघेल. कु र्डुवाडीला दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल. 10 मिनिटांचा थांबा घेऊन ही गाडी पुन्हा मार्गस्थ होईल. गाडीस दौंड, कु र्डुवाडी, उस्मानाबाद, लातूर, परळी वैजनाथ, परभणी आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. गाडीस एकूण 17 डबे जोडण्यात आले आहे. 2 एसएलआर, 6 सर्वसाधारण, 6 शयनयान, 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी असे एकूण 17 डबे जोडण्यात आले आहेत. सोलापूरहून थेट नांदेडला जाण्यासाठी गाडी नसली तरीही कुर्डुवाडी स्थानकावरून प्रवाशांना नांदेडला जाता येईल. सोलापूरकरांना कुर्डुवाडीहून ही रेल्वे पकडणे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे नांदेडला जाणार्‍यांची सोय होणार आहे.


कनेक्शनला ‘इंद्रायणी’ योग्य
कुर्डुवाडीला जाण्यासाठी सोलापूर स्थानकावरून रोज भरपूर गाड्या सुटतात. मात्र, कुर्ला ते नांदेड ही गाडी पकडण्यासाठी दुपारी दोन वाजता सोलापुरहून पुण्याला जाणारी इंद्रायणी एक्स्प्रेस योग्य आहे. त्यानंतर सोलापूरहून गाड्या 5 वाजून 50 मिनिटांनी आहेत. त्यामुळे इंद्रायणी रेल्वेने कुर्डुवाडीला येणे उचित असेल. तर दुसरा पर्याय एसटीने कुर्डुवाडी गाठणे हा राहणार आहे.