आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi, Madha

सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघात 34 लाख मतदार बजावतील उद्या हक्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान होणार आहे. त्यात सुमारे 34 लाख मतदार आपला हक्क बजावतील. प्रशासनाने याची पूर्ण तयारी केली आहे. याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंगळवारी दिली.


सोलापूर मतदारसंघात 8,92,185 पुरुष, तर 8,07,533 महिला मतदार आहेत. बार्शी तालुका वगळता 1751 मतदान केंद्रे आहेत. माढा मतदार संघात 9,00570 पुरुष, 8,05,421 महिला असे एकूण 17,05,991 मतदार आहेत. येथे माण व फलटणसह 1922 मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यातील 95.50 टक्के मतदारांना ही ओळखपत्रे देण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनीही बंदोबस्ताची पूर्ण तयारी केली आहे. सोलापूरला 3400 तर माढा येथे 4100 पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी 75 ते 95 टक्के मतदान झाले होते. त्या केंद्रांवर निवडणूक यंत्रणेची करडी नजर राहणार आहे. तेथे शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त असणार आहे. संवेदनशील असलेल्या 50 गावांत विशेष बंदोबस्त असणार आहे.