आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Maratha Community Reservation

मराठा आरक्षण सर्व्हे एन्ट्री अपूर्णच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुरू केलेले सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, ‘डेटा एन्ट्री’चे काम 65 टक्क्यांवरच थांबले आहे. रखडलेल्या कामात दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्याचा समावेश आहे. सर्वेक्षण व ‘डेटा एन्ट्री’चे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश तहसीलदारांना दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.


नऊ ते 19 फेब्रुवारी कालावधीत सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले होते. त्यानुसार सर्वेक्षणाचे कामही सुरू झाले. मात्र, तहसीलदारांच्या बदल्यांमुळे शेवटच्या टप्प्यात काही तालुक्यांचे काम रखडले. अक्कलकोट व दक्षिण तालुक्यात सर्वेक्षणाचेच काम पूर्ण झाले नाही. अन्य तालुक्यातील डेटा एन्ट्रीचे कामही 65 टक्क्यांपर्यंतच झाले आहे. फेब्रुवारी संपत आला तरी काम अपूर्णच आहे.


दोन दिवसांत एन्ट्रीचे काम पूर्ण करा
तालुका, नगरपालिका व मनपा हद्दीत सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण झाले आहे. ‘डेटा एन्ट्री’ अपूर्ण आहे. ती दोन दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी

सर्वेक्षण झालेली कुटुंबे (कंसात लोकसंख्या)
उत्तर सोलापूर - 100 (537), मंगळवेढा 509 (2624), माढा 2973 (14295), बाश्री 1382 (6399), मोहोळ 2078 (11383), करमाळा 1544 (7731), पंढरपूर 1276 (5382), माळशिरस 2501 (11067), मनपा 9358 (47821).
पालिका हद्दीतील कुटुंबे (कंसात लोकसंख्या)
सांगोला 614 (3008), बाश्री 851 (4008), मंगळवेढा 408 (2072), पंढरपूर 1890 (9289), अक्कलकोट 206 (1046), करमाळा 556 (2823), कुडरुवाडी 366(1940), मैंदर्गी 150 (745), दुधनी 349 (1697).