आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकाने रोखली तान्हुलीची स्मशानाकडे जाणारी वाट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मृत आईनंतर जिवंत नवजात बालिकेस स्मशानभूमीची वाट दाखवण्याचा नातेवाइकांचा अघोरी प्रयत्न एका सजग रिक्षाचालकाने हाणून पाडला. चिमुकल्या जीवास त्याच्यामुळे जगण्याची संधी मिळू शकली.


सहा महिन्यांची गर्भधारणा असलेल्या वनिता डोंगरे (रा. आंधळगाव, ता. मंगळवेढा) यांची 16 फेब्रुवारीला मुदतपूर्व प्रसुती झाली. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यानंतर नातेवाइकांनी नवजात बालिकेस जगण्यासाठी आधार देण्याऐवजी भलताच निर्णय घेतला. 21 फेब्रुवारी रोजी बालिकेस सिव्हिलमध्ये हलविण्यात आले. तिथे नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बालिकेचे वजन 950 ग्रॅम आहे. डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती.


नाही तर काहीही घडले असते..
बाळाच्या हालचाली मला दिसत होत्या. तरीही नातेवाईक स्मशानभूमीकडे जाण्यास सांगत होते. मी जर मृत्यूचा दाखला आहे का? विचारले नसते, तर त्यांनी बाळाचे काय केले असते याची कल्पना करता येत नाही. सध्या बालिकेवर उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांकडे जाऊन येतो, असे सांगणारे नातेवाईक पुन्हा मला दिसले नाहीत. ते गायबच झाले. - अकबर शेख, रिक्षाचालक


सिव्हिलमधील सुरक्षेचा प्रश्न
नातेवाइकांनी सिव्हिलमधील कोणाही व्यक्तीला न सांगता चिमुकलीला बाहेर आणले. रिक्षाचालक अकबर शेख यांच्यामुळे नातेवाईक घाबरले आणि पुन्हा तिला रुग्णालयात ठेवले. यादरम्यान सिव्हिलची यंत्रणा, इतर सुरक्षा यंत्रणा काय करीत होती, असा प्रश्न पुढे आला आहे.


वजन 950 ग्रॅम, उपचार सुरू
वनिता यांच्या चिमुकलीचे वजन 950 गॅ्रम आहे. डॉक्टर तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगतात, तिच्यावर उपचार सुरू आहेत. अकबर शेख यांच्यामुळे तिच्यावर आणखी उपचार सुरू आहेत.


हालचालींमुळे शंका आली
शनिवारी सकाळी उपचार सुरू असतानाच नातेवाइकांनी चिमुकलीला स्मशानाकडे नेण्याचा घाट घातला. त्यासाठी रिक्षाचालक अकबर शेख यांना बोलावले. रिक्षाचालक शेख यांना बाळाची हालचाली सुरू असल्याचे दिसले. शंका आल्यामुळे त्यांनी नातेवाइकांना, ‘तुमच्याकडे मृत्यूचा दाखला आहे का?’ असे विचारले. नातेवाईक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. डॉक्टरांनीच आम्हाला सांगितले आहे, असा खुलासा करू लागले. या दरम्यान त्यांनी बाळाला रुग्णालयातच ठेवले. पोलिसांकडे यासंदर्भात नोंद करतो, असे सांगून नातेवाईक गायब झाले.