आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Pasha Patel, BJP, Divya Marathi

भाजपचे ग्रामीण भागाकडे नमो,5 एप्रिलला पटेल यांची सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मागील तीन दिवस शांत असलेल्या भाजपने आता ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले असून त्यादृष्टीने प्रचार यंत्रणा राबवण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात माजी आमदार पाशा पटेल प्रचारासाठी येणार आहे. तसेच मतदार जागृती अभियान राबविण्यावर भर देण्यात येत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरल्यानंतरही भाजपमध्ये प्रचाराबाबत अद्याप शांतता आहे. सध्या भाजपाने शहरात अंतर्गत प्रचार यंत्रणा, बूथ यंत्रणा कामास लावली आहे. पण प्रचाराची रंगत गुढीपाडव्यानंतर दिसून येणार आहे. डफरीन चौकातील सारस्वत मंगल कार्यालयात प्रचार कार्यालय सुरू करण्यात येणार असून या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी सात वाजता होणार आहे. मित्रपक्ष अद्याप प्रचारात सक्रिय होत नसल्याने भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे.


5 एप्रिल रोजी पाशा पटेल अक्कलकोटमध्ये
भाजपमधील मुस्लिम समाजातील नेते, शेतकर्‍यांच्या प्रo्नावर आक्रमकपणे भूमिका मांडणारे माजी आमदार पाशा पटेल 5 एप्रिल रोजी अक्कलकोट तालुका दौरा करणार आहेत. कूरनूर आणि अक्कलकोट येथे त्याच्या सभा होणार असल्याची, माहिती निवडणूक प्रमुख शंकर वाघमारे यांनी दिली.


भाजपचे ग्रामीण भागाकडे नमो
मतदार जागृती करण्यासाठी जिल्ह्यात अंतर्गत पातळीवर सुमारे साडेतीन हजार कार्यकर्त्यांचा एक गट सक्रिय आहे. मतदान कशासाठी करायचे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ते कार्यकर्ते थेट पक्ष सांगत नसले तरी अप्रत्यक्षपणे भाजपाचा प्रचार करत असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान महायुतीचे उमेदवार शरद बनसोडे यांनी शुक्रवारी सायंकाळी पंढरपुरात किशोर व्यास यांना भेटून आशीर्वाद घेतले.