आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Permit Room, Divya Marathi

एक एप्रिलपासून परमिट रूम बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नूतनीकरण शुल्कात तब्बल 90 हजार रुपयांची वाढ झाल्याने 1 एप्रिलपासून परमिट रूम बंद करण्याचा निर्णय चालकांनी घेतला. याबाबत हॉटेल सिटी पार्कमध्ये बैठक झाली. तीत बेमुदत बंद ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे जिल्हा परमिट रूम आणि बिअर बार मालक संघटनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी माहिती दिली. 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2015 कुठल्याही चालकाने नूतनीकरण करायचे नाही, असेही या बैठकीत ठरल्याचे संघटना सचिव संजीव इंदापुरे म्हणाले.


उत्पादन शुल्क खात्याने परमिट रूम नूतनीकरण शुल्कात यंदा मोठी वाढ केली. गेल्या वर्षी 1 लाख 85 हजार रुपये मोजावे लागले होते. यंदा 2 लाख 73 हजार 600 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच तब्बल 90 हजार रुपयांची वाढ झाली. ती चालकांना अमान्य आहे. नूतनीकरण शुल्कशिवाय इतर करांचा बोजा आहेच. अशा स्थितीत हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे परमीट रूम चालकांच्या बैठकीत ठरले. या वेळी रवींद्र चौधरी, अनिल चव्हाण, आनंद कोटीयन, युवराज चुंबळकर आदी उपस्थित होते.


न्यायालयात जाऊ
आचारसंहितेच्या काळात आंदोलन केल्याने कुठलाच मंत्री शब्द देऊ शकत नाही. पण मागील वर्षीच्या दराने नूतनीकरण करून दिल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ. त्यासाठी मुंबईच्या संघटनेने न्यायालयात धाव घेतली. त्याच धर्तीवर आम्हीही जाऊ.’’ संजीव इंदापुरे, सचिव, सोलापूर हॉटेल असोसिएशन