आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Politics, Sushilkumar Shinde

'45 वर्षांपासून राजकारणात आहे, मला राजकारणातून मोकळे करा'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मागील 45 वर्षांपासून मी राजकारणात आहे, आता मला यातून मोकळे करा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. मोची समाज आयोजित मेळाव्यात ते बोलत होतो.


शिवछत्रपती रंगभवन येथे सोमवारी सायंकाळी चार वाजता याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्री सर्वेसत्यनारायण, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महापौर अलका राठोड, सुधीर खरटमल, प्रेमलाल लोधा, बाळासाहेब शेळके, धर्मा भोसले, प्रकाश यलगुलवार, समाजाचे व संयोजक देवेंद्र भंडारे, मारुती देसाई, अनिल वाडे, अंबादास मोतेकर, मारुती माळगे, विजय मरेड्डी, विवेकानंद लिंगराज, विश्वजित लिंगराज यांच्या उपस्थितीत बाबू जगजीवनराम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी बोलताना शिंदे म्हणाले, ‘मी मंत्री असल्याने आम्हाला संसदेत भांडता येत नाही. पण जे मंत्री नाहीत त्यांना भांडायला लावून आम्ही काम करून घेतो. चौपदरी रस्त्याचे सेंटर सोलापूर व्हावे अशी याची रचना केली आहे. ही गोष्ट गुप्त असते; पण आपणामुळे ते बोलावे लागले.’

सर्वेसत्यनारायण म्हणाले, ‘तेलंगणाचा लढा 60 वर्षांचा आहे. आजपर्यंत अनेक गृहमंत्री झाले; पण शिंदेंमुळे तेलंगणाच्या निर्मितीस हिरवा कंदील मिळाला.’ दीपस्तंभ या स्मरणिकेचे प्रकाशन आणि समाजातील 41 जणांचा सुशीलरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक देवेंद्र भंडारे यांनी केले.