आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Railway Station, Food Corporation Of India, Divya Marathi

खाद्य निगमच्या गोडावूनपर्यंत रूळ टाकण्याची आवश्यकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावर होत असलेली धान्यातील सिमेंटची सरमिसळ थांबवणे सहज शक्य आहे. भारतीय खाद्य निगमचे टिकेकरवाडीचे गोडावून रेल्वे रुळापासून केवळ 68 पावलांवर आहे. येथे रूळ (स्लायडिंग) टाकल्यास थेट गोडावूनमध्ये माल उतरवता येईल. याबाबत रेल्वे प्रशासनाने भारतीय खाद्य निगमला याआधीच कळवले होते. पण काहीच निर्णय झालेला नाही.
पंजाब आदी ठिकाणावरून सोलापूरात रेल्वेच्या माध्यमातून शासकीय धान्य आणले जाते. कामगारांच्या सहाय्याने माल धक्क्यावर उतरवला जातो आणि ट्रकमध्ये लोड करून भारतीय खाद्य निगमच्या गोडावूनमध्ये हलविला जातो. या कामासाठी मक्ता देण्यात आला आहे. धक्क्यावर माल उतरवणे आणि ट्रकमध्ये लोड करणे या प्रक्रियेत सिमेंट आणि धान्याची सरमिसळ होते. नंतरत्याची मालधक्क्यावर आणि भारतीय खाद्य निगमच्या गोडावूनमध्ये स्वच्छता केली जाते.
सव्वा कोटीचा भुर्दंड
रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावरून उचलण्यास विलंब झाला म्हणून भारतीय खाद्य निगम रेल्वे विभागाकडे दरमहा सुमार दहा ते बारा लाख रुपये दंड भरतो, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडे आहे. यानुसार दरवर्षी एक ते सव्वा कोटी रुपये वार्षिक खर्च होतो. याशिवाय मक्त्याची रक्कम वेगळीच आहे. हा खर्च सोसण्यापेक्षा स्लायडिंग टाकणे फायद्याचे आहे. असे झाले तर दरमहा दंडाचे आणि मक्त्याचे पैसे वाचतील. परंतु मक्तेदारांशी हितसंबंध निर्माण झाल्यानेच खाद्य निगम स्लायडिंग टाकण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा संशय बळावत आहे.
गोडावूनपर्यंत रूळ टाकून धान्य थेट गोडावूनमध्ये आणता येईल. यासाठी सुमारे दहा कोटींचा खर्च खाद्य निगमला उचलावा लागेल. मेट्रो सिटीमध्ये अशी व्यवस्था आहे. सुशील गायकवाड, वरिष्ठ रेल्वे अधिकारी