आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Railway Ticket Capacity Increases

रेल्वे प्रवास: मिनिटाला करता येणार आठ हजार तिकिटे बुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - देशात इंटरनेटचे जाळे विस्तारत आहे. त्यासोबत रेल्वेचे इ-तिकीट काढण्याचे प्रमाण वाढत आहे. मिनिटास याचे प्रमाण दोन ते अडीच हजार तिकीट भरते. आता ही क्षमता सुमारे आठ हजारापर्यंत वाढणार आहे. त्यामुळे झटपट तिकीट काढता येणार आहे.


भारतीय रेल्वे खाद्य व पर्यटन महामंडळतर्फे (आयआरसीटीसी) वेबसाइट उन्नत करण्यात येत आहे. त्यासोबत यंत्रणाही उन्नत होणार असून या कामी 100 कोटी रुपये गुंतवणूक महामंडळ करणार आहे. सध्या रोज सुमारे पावणेपाच लाख इ-तिकिटे काढली जातात. देशभरातून हजारो लोकांची एकाचवेळी महामंडळाच्या वेबसाइटवर गर्दी होत असते. परिणामी ताण पडून त्याची गती मंद होते. मधेच वेबसाइट थांबते किंवा संपर्क तुटतो. याचा फटका तिकीट काढणार्‍यांना बसतो. आरक्षित तिकिटासाठी भरलेली माहिती उडून जाते. ती पुन्हा भरावी लागते. या सर्व अडचणी आता दूर होणार आहेत.


काही महिन्यांत सेवेत
तब्बल 100 कोटी रुपये खर्च करून बेवसाइट तयार करण्यात येत आहे. याचे काम आता मध्यावर आले आहे. येत्या काही महिन्यांत काम पूर्ण होऊन ती रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.’’ प्रदीप कुंडू, सरव्यवस्थापक, आयआरसीटीसी, नवी दिल्ली