आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Ramdas Athwale Warned RPI Members

इतर पक्षाच्या प्रचारकार्यात रिपब्लिकन कार्यकर्ते दिसल्यास हकालपट्टी - रामदास आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - येत्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारकार्यात अथवा व्यासपीठावर दिसून आले तर अशा कार्यकर्त्यांची तत्काळ पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती, रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.


श्री.आठवले म्हणाले, ‘‘सध्या देशभर नरेंद्र मोदी यांची लाट आहे. त्यांच्याशिवाय देशाला सक्षम पर्याय नाही. राहुल गांधी यांचे नेतृत्व सक्षम नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएला अडीचशेहून अधिक जागा मिळतील. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शिर्डीमध्ये आपणाला पाडून दलित समाजाला संसेदेची दारे बंद केली होती. भाजप आणि शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे संसदेची बंद झालेली दारे पुन्हा उघडी केली. महायुतीकडे लोकसभेच्या तीन जागांची आम्ही मागणी केली आहे.

मध्यंतरी धवलसिंह मोहितेंनी आपली भेट घेऊन माढय़ातून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महायुतीकडून प्रतापसिंह निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते. मात्र विजयसिंह मोहिते यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते निवडणूक लढवतील असे वाटत नाही. सोलापूर लोकसभा मतदार संघाची जागा महायुतीमधील भाजपला सोडण्यात आली आहे. या राखीव जागेसाठी त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसेल तर आमची सोलापुरात ताकद आहे. पंढरपूरमधून आपण दहा वर्षे खासदार म्हणून चांगले काम केले आहे. त्यामुळे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात व सातार्‍यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या विरोधात रिपब्लिकन पक्ष चांगला उमेदवार देऊ शकेल. असे आठवले म्हणाले.