आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Ration Store, Solapur District Supply Officer,Divya Marathi

सहा रेशन दुकानांचे परवाने रद्द,जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांची कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्वस्त धान्य दुकान तपासणी मोहिमेत दोषी आढळलेल्या दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. दुकानदारांचे म्हणणे ऐकून 6 दुकानांचे परवाने जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी रद्द केले आहेत. दुकानांची अनामत रक्कमही जप्त केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण यांनी ही माहिती दिली. हे परवाने महिला बचत गटांना देण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आदेशानुसार नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात तालुकानिहाय स्वस्त धान्य दुकानांची तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील अध्यक्ष, जय संतोषी माता महिला औद्योगिक संस्था, तर मालवंडी येथील महादेव एकनाथ कटकधोंड यांच्या दुकानाचा परवाना रद्द झाला. गोणेवाडी (ता. मंगळवेढा) येथील बी. डी. मासाळ, घारगाव (ता. करमाळा) येथील देविदास रामहरी होगले यांचा परवाना रद्द करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी तपासणी केलेल्या भंडारकवठे (दक्षिण सोलापूर) येथील दोन्ही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. रेशन दुकानदार एस. ए. बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दुकानामध्ये 1 लाख 7 हजार 284 रुपयांचा अपहार झाला असून त्याच्या वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. भंडारकवठे येथील के. के. तुर्भे यांच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला.
शासकीय दरापेक्षा जादा दराने विक्री, चालू महिन्यातील धान्याची उचल नाही, अधिकृत वजनमापे नाहीत, शासन नियमाप्रमाणे मालाचे वाटप नाही, विक्री पावत्यांमध्ये घोळ आदी गंभीर आक्षेप असल्याने या दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.