आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Science Centre For Solapur Citizens

विज्ञानातील आनंददायी नवलाई आली सोलापूरच्या कक्षेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूरपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर सोलापूर विद्यापीठालगत असलेले विज्ञान केंद्र म्हणजे सोलापूरकरांसाठी एक आनंदाची पर्वणी देणारा प्रकल्प असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विज्ञान जाणून घेण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली विज्ञान गॅलरी, थ्रीडी थिएटर, सायन्स पार्क यामुळे आनंदात आणखी भर पडते.


2010 मध्ये या सायन्स सेंटरची येथे सुरुवात झाली असली तरी याची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. येथे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून काही उत्सुकतावर्धक अशा विज्ञान खेळांची माहितीही दिली जाते. काही वैज्ञानिक खेळातील आनंद स्वत:लाही लुटता येतो. बहुतांश विज्ञान चमत्कारासमोर असलेल्या फलकावरील माहिती वाचून त्याचा अनुभव घ्यावयाचा आहे. शेवटी असे का घडले? याची माहिती देणारा तक्ताही प्रत्येक उपकरणासमोर आहे. यामुळे केवळ विज्ञानाच्या नजरेने न पाहता प्रत्येकजण कुतूहल आणि जिज्ञासेपोटी तो खेळ खेळतो. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यामुळे खूप फायदा होत आहे.


काय पाहाल येथे?
येथे अबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी चुंबकीय प्रयोगातील फोन सायन्स, बटण दाबल्यावरचा भौतिकशास्त्रातील फ्लोटिंग डिस्क, 14 केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर व त्याला जोडणारी ज्योत यांचा रायझिंग आर्क, 2 अंतर्वक्र कमानी, त्यांच्यामध्ये काढलेल्या काठीचा अँक्रोबेटिक स्टीक, शेगडीची कॉईल आणि चुंबक यांच्यातील विद्युतीकरणाने आकर्षण व प्रतिकर्षण करणारा क्युरी पॉइंट गेम, ताटात चेहरा मांडल्यासारखे दिसते असा हेड ऑन दी फ्लॅटर तसेच थ्रीडी (त्रिमितीय) चित्रपटगृह आदी वैशिष्ट्यांनी विज्ञान केंद्राला अधिकच शोभा आली आहे.

सवलतीच्या दराचा फायदा घ्यावा
सर्व स्तरातील नागरिकांना फायदा व्हावा, या उद्देशाने याची निर्मिती केली आहे. यापूर्वी तारांगण, खगोलीय माहिती, वैज्ञानिक प्रयोग, खेळातून मनोरंजन आदी गोष्टींसाठी हैदराबाद किंवा पुणे-मुंबई गाठावी लागत होती. परंतु सोलापुरातच ही सुविधा उपलब्ध केल्याने त्याचा फायदा घ्यावा. 5 वर्षांच्या आतील मुलांना पूर्णत: मोफत तर शालेय विद्यार्थ्यांना अध्र्या किमतीत आणि इतरांना प्रत्येकी 40 रुपये इतके माफक शुल्क आहे.’’ राहुल दास, संग्रहालय अभिरक्षक, सोलापूर विज्ञान केद्र