आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Shetkari Kamgar Party, Lok Sabha Election

मागे वळून पाहताना: शेकापने दिली सलामी; पाठोपाठ संयुक्त समिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लोकसभेच्या 1951-52 मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत पंडित नेहरूंचा आणि स्वातंत्र्य चळवळीचा काँग्रेसचा प्रभाव असतानाही सोलापुरात मात्र शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव दिसून आला. तर त्यानंतरच्या 1957 च्या निवडणुकीत मात्र राजकीय चित्रच पालटले. एका जागेवर काँग्रेसने खाते उघडले तर दुसर्‍या जागेवर संयुक्त महाराष्ट्र समितीने विजय मिळविला.


देशाच्या पहिल्याच निवडणुकीत सोलापुरातून लोकसभेच्या दोन जागा होत्या. त्यात शेतकरी कामगार पक्षाकडून शंकरराव शांताराम मोरे व बापूसाहेब तथा पांडुरंग नाथुजी राजभोज यांनी लोकसभेसाठी अर्ज भरले होते. तर काँग्रेसकडून दोन जागेसाठी तायप्पा हरी सोनवणे आणि कृष्णा भीमराव अंत्रोळीकर त्यांच्या विरोधात होते. या शिवाय सोशालिस्ट पार्टीतर्फे विष्णू गणेश वैशंपायन तर अखिल भारतीय रामराज्य परिषदेतर्फे भागवत जयराम मोरे यांनीही नशिब अजमावयचे ठरविले होते. तेव्हा एकूण मतदारांची संख्या (सोलापूर जिल्ह्यातील) संख्या होती 8 लाख 32 हजार 165. त्यापैकी जवळपास 55 टक्के मतदान झाले. त्यात शेतकरी कामगार पक्षाचे मोरे आणि राजभोज विजयी झाले. काँग्रेसचे सोनवणे आणि अंत्रोळीकर यांना पराभवाचा झटका बसला. देशात काँग्रेसची लाट असतानाही सोलापुरातील हा निकाल धक्कादायक होता. मात्र, ही राजकीय परिस्थिती पुढच्या 1957 च्या निवडणुकीत टिकली नाही.