आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Solapuri Curtain, Painter Prakash Pore

सोलापुरी चादरीची नक्षी जाईल जगभर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - चित्रकार प्रकाश पोरे यांनी लहान मुलांच्या हक्क व मदतीसाठी काम करणार्‍या चिल्ड्रन राइट अँड यू (क्राय) या संस्थेसाठी चित्र रेखाटून दिले आहे. या चित्रात सोलापुरी चादरीची नक्षी वापरण्यात आली आहे. या चित्राच्या माध्यमातून सोलापूरची ओळख बनलेल्या चादरची स्मृती आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळत राहणार आहे.


शिक्षणापासून वंचित असणार्‍या आणि गरिबीमुळे शापीत जीवन जगणार्‍या मुलांना मदत करणारी क्राय ही संस्था विविध प्रकारची उत्पादने तयार करते आणि ती उच्चभ्रू वर्गात विकते. यातून मिळालेल्या रक्कमेतून मदत कार्य चालते. आता या सर्व उत्पादनांवर प्रकाश पोरे यांनी रेखाटलेले ‘एक तरुणी स्वप्न पाहतेय’ असे चित्र असेल. चादरीच्या चौकटीत मधोमध तरुणी चित्रात आहे. पोरे यांनी हे चित्र विनामूल्य काढून दिले आहे.


असे बनवले चित्र
पुण्याच्या अभिनव महाविद्यालयातून प्रकाश पोरे यांनी शिक्षण घेतले. त्यांनी आजपर्यंत अनेक चित्रांची निर्मिती केली. इ- मेलच्या माध्यमातून पोरे यांनी 36 हजार रुपये किमतीचे ड्रीम हे चित्र क्रायला भेट म्हणून पाठवून दिले. क्राय संस्थेने आपल्या सर्व उत्पादनांसाठी ते चित्र वापरले आहे. टोपी ,कप, मग, टी शर्ट, वह्या, बोर्ड, पेन आणि विविध प्रकारच्या वस्तुंवर पोरे यांनी काढलेले चित्र असणार आहे.
मला समाजसेवा केल्याचे समाधान वाटते. मी जे चित्र रेखाटलेले आहे ते क्रायच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर सगळीकडे जाणार आहे. त्यातून जी मदत मिळणार आहे त्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण होईल. त्यामुळे मला आनंद होत आहे. प्रकाश पोरे, चित्रकार