आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Subhash Deshmukh, BJP, Divya Marathi

स्वतंत्र पक्ष ही चांगली कल्पना; त्या दृष्टीने आता विचार करतोय - सुभाष देशमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आजकाल छोटे पक्ष मोठे तर राष्ट्रीय पक्ष छोटे होताना दिसून येत आहेत. आजच मला एकाने ‘स्वतंत्र पक्ष’ ही चांगली कल्पना दिली. मी नेहमीच चांगल्या कल्पनेवर विचार करतो, असे सांकेतिक मत भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.


महायुतीकडून उस्मानाबादची जागा रोहन यांनाच मिळेल, अशी शेवटच्या क्षणापर्यंतची आशा आहे, असेही सांगितले. सोलापूर र्शमिक पत्रकार संघात रविवारी सायंकाळी र्शी. देशमुख यांचा वार्तालाप झाला. यावेळी देशमुख म्हणाले, मी पक्षाचा आदेश मानतो, यातून नेहमीच माझा बळी गेला. 2003 च्या विधान परिषद निवडणुकीत मी विद्यमान आमदार असताना रणजितसिंह मोहितेंना बिनविरोध निवडून द्यायचा निर्णय झाला. 2004 मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात नैतिक जबाबदारी म्हणून प्रतापसिंह मोहितेंनी लढणे अपेक्षित होते. प्रतापसिंहांनी पळ काढला. त्यामुळे पक्षाने मला आदेश दिला आणि मी निवडणूक लढविली. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मला माढय़ातून शरद पवारांविरोधात लढण्यास सांगण्यात आले. पून्हा विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी तुळजापूरला जायला सांगितले.


कुठे माशी शिंकली
उस्मानाबादची जागा रोहन देशमुख यांनाच मिळाली असती. सगळे काही जुळूनही आले होते. पण अखेरच्या क्षणी माशी शिंकली. ती कुठे शिंकली हे शोधतोय. पक्ष नेतृत्वाला त्यासंदर्भात विचारणाही करणार आहे, असे देशमुखांनी सांगितले.

प्रतापसिंहांची शाश्वती नाही
माढा मतदारसंघातून प्रतापसिंह मोहिते उभे राहतील याबाबत शाश्वती नाही. प्रतापसिंह उभे राहिल्यास सदाभाऊ खोत निश्चितपणे निवडून येतील. प्रतापसिंह नसतील तर महायुतीला उमेदवार निवडून आणण्यासाठी जादा पर्शिम घ्यावे लागतील, असेही देशमुखांनी सांगितले.पक्ष संकटात असतो, तेव्हा चांगल्या कार्यकर्त्याला शोधून संधी दिली जाते. पक्षाला जेव्हा चांगले दिवस येतात, तेव्हा कार्यकर्त्यांला वाईट दिवस येतात, असे सांगून देशमुखांनी पक्षाकडून होणार्‍या कोंडीबाबत खंत व्यक्त केली.


तडजोड करीत नसतो
उस्मानाबाद मतदारसंघात महायुतीची कोंडी करण्यासाठी पद्मसिंह पाटील यांच्यासोबत तडजोड झाली आहे का? असे विचारले असता देशमुख म्हणाले, सोलापुरात मेडिकल कॉलेज काढण्यासाठी मी प्रयत्न केले. माझ्याकडे 40 तज्ज्ञांची टीम होती. केवळ मी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढविली म्हणून माझा प्रस्ताव डावलण्यात आला. तरीही मी तडजोड केली नाही. मी कधीही तडजोडीचे राजकारण करीत नसतो, असेही देशमुख यांनी सांगितले.

प्रचाराला जाणार
सध्या पक्षाकडून कोणताही आदेश नाही. त्यामुळे मी रिकामटेकडा आहे. सोलापूर, माढा आणि उस्मानाबाद मतदारसंघावर माझे लक्ष आहे. तीनही ठिकाणी प्रचारासाठी जाणार आहे.

..तर संघटन वाढेल
जिल्ह्यात भाजपकडे तीन मतदारसंघ आहेत. मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांचा ज्या पक्षाची जागा आहे त्याच पक्षात जाण्याकडे ओढा असतो. मतदारसंघ वाढवून मिळाले तर संघटन वाढेल.