आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Sushilkumar Shinde, Home Minister

‘मुस्लिमांवरील शिंदेंचे प्रेम हे पुतनामावशीसारखे दिखाऊ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘काँग्रेस पक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून केवळ आश्वासनांची सरबत्ती करण्यात येते. मुस्लिम समाजाला सत्तेमध्ये स्थान दिले जात नाही. काँग्रेस आणि शिंदे यांचे मुस्लिमांवरील प्रेम हे पुतनामावशीच्या प्रेमासारखे दिखाऊ आहे’, असा आरोप ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत केला. समाजाचा विचार झाला नाही तर आगामी निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाकडून उमेदवार उभे करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला. या वेळी शब्बीरअहमद अन्सारी, इसहाक खडके, मुसा मुर्शद, करिम बागवान, अब्दुलभाई मिर्जा, युनूस मुर्शद, रशीद बेद्रे, समद माडी उपस्थित होते.


मुस्लिम समाजाला डावलण्यात आले
2004 च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांना आरक्षणासाठी कॉंग्रेसने सच्चर कमिटी व रंगनाथ आयोगाची घोषणा करून मते घेतली. परंतु, त्यावर अंमलबजावणी झाली नाही. मुस्लिम समाजाने आपल्या प्रभावाखालील लोकसभा व विधानसभा मतदार संघातील उमेदवारीचा त्याग करून काँग्रेसला साथ दिली. सोलापुरात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलीला निवडून आणले. नांदेड जिल्ह्यात मुस्लिम बहुसंख्य असताना तेथेही मुस्लिम समाजाला डावलण्यात आले आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत 48 पैकी एकही खासदार मुस्लिम समाजाचा नाही. हीच स्थिती विधानसभेची आहे.बुधवार बाजार येथे ऑर्गनायझेनच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. बुधवारी सकाळी 11 वाजता मोहोळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.