आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Sushilkumar Shinde, Sharad Bansode, Congress

सुशीलकुमार शिंदे, शरद बनसोडेंच्या विरोधातील हरकत फेटाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - काँग्रेस उमेदवार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि भाजप उमेदवार अँड. शरदकुमार बनसोडे यांच्या उमेदवारी अर्जास अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी फेटाळली. दोन्ही उमेदवारांचे अर्जही मंजूर केले.


दोन्ही उमेदवारांचा जातीचा दाखला बनावट आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने योग्य पडताळणी केली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार दोन्ही उमेदवारांचे अर्ज रद्द करावेत, अशी हरकत अपक्ष उमेदवार गायकवाड यांनी घेतली.
यावर संबंधित उमेदवारांनी अर्जावर जातीचा उल्लेख केला असून त्याच जातीचे प्रमाणपत्रही जोडले असल्याने अर्ज मंजूर होत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले.
7 जणांचे अर्ज बाद
छाननीत माढा मतदारसंघातील 3 तर सोलापूर मतदारसंघातील 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. माढा आणि सोलापूर मतदारसंघातील सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते अँड. शरदकुमार बनसोडे या प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. छाननीनंतर माढा लोकसभा मतदारसंघात 32 तर सोलापूर मतदारसंघात 45 उमेदवार राहिले आहेत.
न्यायालयात जाऊ
सुशीलकुमार शिंदे व शरदकुमार बनसोडे यांचे जात वैधता प्रमाणपत्र उच्च् न्यायालयाने रद्द केले आहे. त्यांचे उमेदवारी अर्ज रद्द करावे, अशी हरकत घेतली होती. आता न्यायालयात दाद मागणार आहे.’’ प्रमोद गायकवाड, अपक्ष उमेदवार.