आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Temperature, Divya Marathi

सोलापूरचा पारा 39.4 अंशांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानंतर आता हळूहळू उन वाढत आहे. होळीनंतर आता उन्हाचा चटका तीव्र होऊ लागला आहे. रविवारी 39.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा कडका वाढल्याने सोलापूरकर घामाघूम होऊ लागले आहेत.


कमी दाबाच्या पट्टय़ाचा प्रभाव कमी झाल्याने काही दिवसांपासून हवामान कोरडे आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच कमाल तापमानाचा पारा 39.4 अशं सेल्सिअसपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून 37 अंश सेल्सिअसच्या वर कमाल तापमान आहे. त्यामुळे रस्त्यावर दुपारी एक ते तीन वाजेच्या सुमारास शुकशुकाट दिसून येतो आहे. तसेच शीतपेयांच्या दुकानावर गर्दी दिसत आहेत.