आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur News On City Bus Service, Transport System

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार मार्गांवरील सिटीबसचे तिकीट दर कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रेल्वे स्टेशन ते गोदूताई (व्हाया निलमनगर), रेल्वे स्टेशन ते देसाई नगर, शिवाजी चौक ते विंचूर आणि शिवाजी चौक ते चंद्रमोळी वसाहत (मोहोळ) या चार मार्गावरील सिटीबसचे दर परिवहन समितीच्या सभेत शनिवारी कमी करण्यात आले. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर समितीने हा निर्णय घेतला आहे. एक टप्पा कमी करण्यात आल्याने दोन ते चार रुपयाने दर कमी होणार आहेत.

परिवहन समितीची सभा शनिवारी सभापती सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. चार मार्गावर अवैध वाहतूक जास्त प्रमाणात होत असल्याने सिटीबस पेक्षा त्याचे दर कमी असल्याने परिवहनच्या उत्पन्नात घट होत आहे. अनिल कंदलगी यांनी आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.


असे असतील नवीन दर (कंसात पूर्वीचे दर)
रेल्वे स्टेशन ते गोदूताई : 10 (14)
रेल्वे स्टेशन ते देसाई नगर : 10 (14)
शिवाजी चौक ते विंचूर : 37 (41)
शिवाजी चौक ते चंद्रमोळी : 37 (41)