आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइलवर मिळणार रेल्वे तिकीट,रेडिओ लहरीची घेतली जाणार मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर असणार्‍या लांबलचक रांगा पाहून अनेक प्रवाशांच्या उरात धडकी भरते. आता दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासन आणखी एक पुढे पाऊल टाकत आहे. तिकिटांसाठी रांगेत न उभारता प्रवाशांना तिकीट देण्याचा विचार होत आहे. इतकेच काय तर तुम्हाला ज्या गाडीने जायचे आहे त्या गाडीत बसल्यानंतरही तुम्ही तुमचे तिकीट काढू शकाल. ते तुमच्या मोबाइलवरून. तुम्ही इंटरनेटचे ग्राहक नसाल तरीही. वाचून तुम्हाला कदाचित धक्का बसेलही. पण, हे खरे आहे. रेल्वे प्रशासन अशी यंत्रणा आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.


अशी असेल यंत्रणा
रेल्वे प्रशासन रेल्वे स्थानकाच्या परिसरात रेडिओ सिग्नलिंग यंत्रणा सुरू करण्याच्या विचारात आहे. ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या परिसरात रेडिओ लहरी अँक्टिवेट होतील. रेडिओ लहरींचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात प्रवासी आल्यानंतर तो आपल्या मोबाइलच्या माध्यमातून त्या सिग्नलिंग यंत्रणेला जोडला जाईल. यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. ही यंत्रणा स्थानकावरील तिकीटप्रणालीला जोडलेली असेल.


यंत्रणेसाठी चाचपणी सुरू
> रेल्वे आरक्षण केंद्रावरील आरक्षण यंत्रणा ही अत्यंत फायरप्रूफ आहे. त्यामुळे ही यंत्रणा हॅक करता येत नाही. त्याच धर्तीवर रेडिओ यंत्रणा काम करेल का? याबाबत शंका आहे. आरक्षण यंत्रणेप्रमाणेच रेडिओलहरी यंत्रणा सक्षम करण्याबाबत रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.
> रेडिओ लहरी यंत्रणा स्थानकावरील तिकीट प्रणालीला जोडलेली असेल. आपल्याला कोणते तिकीट हवे, कुठे जावयाचे आहे, किती व्यक्ती प्रवास करणार आहेत. या संदर्भातील माहिती आपण मोबाइलद्वारे दिल्यास ते थेट संगणक प्रणालीत जोडले जाईल. आर्थिक व्यवहारासाठी प्रवाशांच्या बँक खाते क्रमांकाचा विचार करायचा की, त्याचे स्मार्ट कार्डसारखे रेल्वे अंतर्गत खाते काढायचे यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

रेल्वे बोर्डकडून याबाबत सध्या वरिष्ठ पातळीवरून याचा विचार सुरू आहे. या संदर्भात चाचपणी केली जात आहे. ती यंत्रणा लाँच झाल्यावरच नेमकी कशा पद्धतीने काम करेल, हे समजेल. सुशील गायकवाड, वरिष्ठ विभागीय दळणवळण व्यवस्थापक.