आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur Nimbargi Murder Case Three Accused Police Custody

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निंबर्गी प्रकरण : तिघांना चार दिवसांची कोठडी, पैसे न दिल्याने केला होता आजोबांचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर - जुगार व बेटिंगमुळे झालेले चार-पाच हजारांचे कर्ज फेडण्यासाठी पैसे न दिल्याने आजोबांचा खून करणार्‍या दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी गावातील नातवासह त्याच्या आई व वडिलास मंगळवारी मंद्रूप पोलिसांनी सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता सह दिवाणी न्यायाधीश एस. डी. कंकणवाडी यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.

महादेव हालप्पा गुरव (वय 75) यांचा खून झालेला होता. नातू कपिल मल्लिकार्जुन गुरव (वय 19), सून शालन मल्लिकार्जुन गुरव (वय 40) व मुलगा मल्लिकार्जुन महादेव गुरव (वय 50) असे पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. मंद्रूपचे साहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद घुगे, हवालदार ख्वाजा मुजावर, अल्ताफ शेख, अशोक ढवळे, शिपाई गंगूबाई कवचाळे यांनी आरोपींना चार वाजता न्यायालयात हजर केले.

महादेव गुरव यांचा खून आरोपींनी आणखी कोणत्या कारणासाठी केला आहे का, याचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. आरोपीच्या वकिलांनी खून कोणी केला हे स्पष्ट नसल्याचे सांगत केवळ संशयित म्हणून आरोपींना अटक केल्याचा मुद्दा मांडला. मात्र न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीचे आदेश दिले. सरकारी वकील म्हणून अँड. ए. आय. कोकणे तर आरोपीकडून अँड. नागेश खिचडे यांनी काम पाहिले.

मृतदेहावर अंत्यसंस्कार
मृत महादेव गुरव यांच्या अर्धवट अवस्थेत जळालेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी झाले. महादेव यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. निंबर्गी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


गळा दाबल्याने मृत्यू
महादेव गुरव यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचा शवविच्छेदनाचा अहवाल आहे. मृतदेह सरपणावरती टाकून पेटवून दिला. मृताच्या कमरेला असलेल्या चाव्या आरोपींनी लपवून ठेवल्या होत्या. त्यामुळे लवकर ओळख पटत नव्हती. मात्र, गुन्हा कबूल करून आरोपींनी चाव्या काढून दिल्या आहेत.’’ विनोद घुगे, साहाय्यक पोलिस निरीक्षक, मंद्रूप