आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा नियोजन समिती निवडणूक : आजी-माजी महापौरांसह तिघांचा फैसला आज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्हा नियोजन समिती निवडणुकीसाठी महापालिका गटातून अर्ज केलेल्या महापौर अलका राठोड, माजी महापौर आरिफ शेख व माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे यांच्या उमेदवारीचा फैसला सोमवारी होणार आहे. तिघांच्या अर्जांवर विरोधकांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे त्याची सुनावणी झाली आहे. अर्ज मंजूर झालेल्या उमेदवारांची यादी सोमवारी प्रसिद्ध होणार आहे.

सर्वसाधारण जागेवर निवडून येऊन आरक्षित जागेवर अर्ज दाखल केल्याने तिघेही अडचणीत आले आहेत. महापौर राठोड यांनी सर्वसाधारण जागेवर भरलेल्या अर्जावर त्यांची स्वाक्षरी नसल्याने त्या स्वत:च अडचणीत आल्या. ओबीसी प्रवर्गातून अर्ज दाखल केलेले महापौर अलका राठोड, माजी महापौर आरिफ शेख आणि अनुसूचित जाती-जमातीतून देवेंद्र भंडारे हे पक्षांतर्गत कोठे गटाचे विरोधक आहेत. त्यामुळे त्यांना मुद्दामहून अडचणीत आणल्याची चर्चा आहे. महापौर राठोड यांनी छाननीदिवशी तशी मूक स्पष्टोक्ती दिली. या तिघांचा अर्ज बाद झाल्यावर त्यांचा फायदा भाजपाला होणार आहे. त्याच्याकडील पक्षीय बलाबलानुसार तीन जागा येणे अपेक्षित असताना ऐनवेळी अर्ज दाखल केलेल्या नरसूबाई गदवालकर यांना जिल्हा नियोजन समितीत जाण्याची अनपेक्षित संधी मिळणार आहे. त्यामुळे भाजपाचे चार सदस्य होणार आहेत. महापालिकेत सत्तेवर असलेले राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडे 61 संख्याबळ तर युतीकडे 33 सदस्य आहेत. युतीकडे कमी संख्याबळ असताना चार सदस्य नियोजन समितीत जात असतील तर काँग्रेसच्या अंतर्गत राजकारण आणि अज्ञानपणामुळे महापौरासह अन्य तिघांना समितीतून आउट होण्याची वेळ येणार आहे.

महापौर संतापल्या
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत उमेदवारी धोक्यात आल्याने महापौर अलका राठोड संतापल्या. गुरुवारी छाननीत त्यांचा एक अर्ज सही नसल्याने बाद झाला. महापौरांना नियोजन समितीतून आऊट होण्याची वेळ आली. त्याचे खापर स्वकीयावर फोडत जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या सायंकाळी महापालिकेत आल्या नाहीत. त्यांच्या दुसर्‍या इतर मागास वर्गातील (ओबीसी) अर्जास विरोधी पक्षाच्या नगरसेविका शोभा बनशेट्टी यांनी हरकत घेतली आहे.