आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थकल्या रकमा : पालिकेच्या 36 अधिकार्‍यांकडे 69 कोटींचा हिशेब बाकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेच्या कामासाठी पालिकेच्या तिजोरीतून अँडव्हान्स (अनामत) रकमेचा हिशेब द्या, अन्यथा सप्टेंबर महिन्यात वेतन दिले जाणार नाही, असा लेखी आदेश महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार काढला. त्यामुळे अधिकार्‍यांची दमछाक सुरू आहे. पालिका स्वीय सहाय्यक ते प्रशालेचे मुख्याध्यापक अशा विविध पदांवरील सुमारे 36 अधिकार्‍यांकडे सुमारे 69 कोटी रुपयांचा हिशेब मुख्य लेखापाल कार्यालयाकडे जमा झालेला नाही. हा हिशेब सन 2003-04 पासूनचा आहे.

पदाधिकार्‍यांचे काय?
महापालिका पदाधिकार्‍यांनी दौर्‍यावर जाताना महापौरांच्या शिफारशीने अँडव्हास रक्कम घेतलेली आहे. त्यांच्याकडील रकमेचा हिशेब नसल्याने तोही प्रलंबित आहे. निवडणुकीसाठी पदाधिकारी हे शेवटी हिशेब देतात, पण तोपर्यंत वापरलेल्या रकमेचे काय?

हिशेब तत्काळ देण्याचे आदेश
69 कोटींच्या रकमेत निवडणूक अधिकारी आणि परिवहन व्यवस्थापक यांच्याकडे सर्वात जास्त रक्कम म्हणजे 21 कोटी रुपये विनाहिशेब आहे. त्यापाठोपाठ नगर अभियंता 10 कोटी, सार्वजनिक आरोग्य अभियंत्याकडे 19 कोटी रुपये आहे. या रकमेचा हिशेब तत्काळ देण्याचे पत्र पालिका आयुक्त गुडेवार यांनी दिले आहे.

हिशेब नसल्यामुळे काय होते?
महापालिकेच्या ऑडिटमध्ये त्रुटी.
रक्कम कोणी किती खर्च केली याचा हिशेब नसल्याने संशय.
आर्थिक भ्रष्टाचार करण्याला वाव मिळतो.

विभाग प्रमुखांचे वेतन रोखण्याचा दिला इशारा
ज्या विभागाकडून अँडव्हान्स रकमेचा हिशेब दिला नाही, त्या विभाग प्रमुखाचे वेतन रोखण्याचे आदेश आयुक्त गुडेवार यांनी दिले आहेत.