आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेने स्वीकारले सफाईचे आव्हान, कचरा कुंड्यांना पूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातीलकचरा उचलण्याचा मक्ता समीक्षा एजन्सीला देण्यात आला होता. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून कामबंद करून पालिकेच्या कराराचा भंग केला आहे. शहरात सुमारे २०० टन कचरा मंगळवारी पडून होता. आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन महापालिकेने पर्यायी यंत्रणा उभी करून कचरा सफाईचे आव्हान स्वीकारले आहे. घरोघरी येणाऱ्या घंटागाड्या बंद झाल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आरोग्य विभागाने केले आहे.

गाड्याताब्यात देण्यास विरोध
समीक्षाकडेमहापालिकेची सफाई वाहने होती. ती ताब्यात घेण्यासाठी मंगळवारी पहाटे मनपाचे सफाई अधीक्षक रवींद्र तलवार, आरोग्य निरीक्षक डी. एस. पुजारी हे रविवार पेठेतील समीक्षा एजन्सीच्या कार्यालयात गेले होते. तेथील एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी गाड्या ताब्यात देण्यास विरोध दर्शविला. नाईलाजाने पालिकेला पोलिस बंदोबस्त घ्यावा लागला. पोलिसांच्या सहकार्याने पालिका मालकीची वाहने ताब्यात घेण्यात आली.घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या मंगळवारी बंद होत्या.
शहरात कचरा साचला
शहरातनवी पेठ, टिळक चौक, चौपाड, कुंभार वेस, कोंतम चौक, साखर पेठ, लक्ष्मी मार्केट, हद्दवाढ भाग, पूर्व भागात कचरा साचल्याचे दिसून आले. महापालिकेने काही ठिकाणचा कचरा उचलला.

कॅम्पेक्टरताब्यात
मनपानेकॅम्पेक्टर ताब्यात घेऊन प्रत्येक झोनला दिले. याशिवाय एक डंपर दिला. १६ वाहनचालक इतर विभागातून आरोग्य विभागात घेतले. एका खासगी मक्तेदारास काम देऊन त्यांच्याकडून कचरा उचलण्यात येत आहे.