सोलापूर - एकीकडेवाढत्या वाहनांमुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी ही बेशिस्तीचे दर्शन जरी घडवत असली तरी दुसरीकडे ती सोलापूरकरांच्या श्रीमंतीचेही दर्शन घडवत आहे. आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून या श्रीमंतीचे वेगळे रूप दिसत आहे. दिवाळीला होणाऱ्या वाहनांच्या विक्रीत दुचाकीपेक्षा काकणभर जास्त अशी संख्या मोटारकारची आहे.
दरवर्षी दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर वाहनांची खरेदी केली जाते. मागील वर्षी आणि यंदा अशा दोन्ही वर्षी दुचाकींपेक्षा जास्त मोटारकारची नोंदणी सोलापूर आणि अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. त्यावरून सोलापूकरांचा वाहनाच्या बाबतीत कल बदलत असल्याचेही दिसून येत आहे.
‘कार असावी दारी’ हे नवमध्यम वर्गाचे स्वप्न बँकाच्या स्वस्त आणि तत्पर कर्ज योजनांमुळे आवाक्यात आले आहे. सर्वच राष्ट्रीय बँका, सहकारी बँका आणि फायनान्ससारख्या आर्थिक संस्थांनी वाहनखरेदीसाठी कर्ज योजना आणलेल्या आहेत. कर्ज देण्याची प्रक्रियाही सोपी असून वाहनांच्या शोरुममध्ये बँकांचे प्रतिनिधी सेवा देत आहेत. त्यामुळे कर्जासाठी खेटे घालावे लागत नाही, याउलट प्रेम आणि
आपुलकीने बँकांचे प्रतिनिधी ग्राहकांचे स्वागत करताना दिसत आहेत.
दुचाकीच्या विक्रीत वाढच
आरटीओकडे जरी वाहनांच्या नोंदणीची संख्या कमी दिसत असली तरीही आमच्याकडे मात्र उलट वाहनांच्या विक्रीच्या संख्येत वाढ झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेने विक्रीत १५ टक्क्यांनी वाढ आहे.” दीपकपाटील, वाहनविक्रेते