आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Pilgrim Safe Return From Uttrakhand Flood

सोलापूरच्या आणखी 10 पर्यटकांची बद्रिनाथमधून सुटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उत्तराखंडमधील महाप्रलयामध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील 21 पैकी 10 पर्यटकांना लष्कराच्या जवानांनी बद्रिनाथमधून सुखरूप बाहेर काढले आहे. जिल्ह्यातील 11 पर्यटक अद्याप बद्रिनाथमध्ये अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी नियंत्रण कक्षातर्फे प्रयत्न सुरू आहेत.

गुरुवारी सायंकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत 101 पर्यटक सुखरूप परतले आहेत. उर्वरित परतीच्या मार्गावर आहेत. सोलापूरच्या सिंघम कुटुंबातील दहा जणांना जवानांनी गुरुवारी दुपारी बद्रिनाथमधून बाहेर काढले. ऋषीकेशमार्गे जोशीमठात त्यांना हलविण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी किंवा शनिवारपर्यंत उर्वरित पर्यटकांची सुटका होईल, असे डेहराडूनच्या नियंत्रण कक्षातील अधिकारी व सोलापूरचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितले.

बद्रिनाथमध्ये अडकलेल्या 11 पर्यटकांमध्ये बार्शी तालुक्यातील डॉ. प्रसाद कुलकर्णी, विनोद पवार, बापू कुलकर्णी आदींचा समावेश आहे. पाच दिवसांपूर्वी त्या पाच पर्यटकांची प्रकृती ढासळली होती. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना जेवणाची व आरोग्याची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे नाटेकर यांनी सांगितले. गुरुवारी सुटका झालेल्या 35 पर्यटकांमध्ये 14 जण महाराष्ट्रातील आहेत. अद्यापही पुणे विभागातील 275 पर्यटकांचा अडकलेल्यांमध्ये समावेश आहे.