आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा’; राजपथ संचलनात सोलापूरचा फडकतोय झेंडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणार्‍या संचलनासाठी सोलापुरातून पाच जणांची निवड झाली आहे. देशातून राष्ट्रीय विद्यार्थी सेना (एनसीसी)च्या 13 लाख विद्यार्थ्यांमधून 106 जणांचे पथक निवडले जाते. येथून निवड झालेल्या पाच जणांमध्ये चार विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. मागील वर्षी हा आकडा सात होता आणि विद्यार्थिनींची संख्या जास्त म्हणजे सहा होती.

2013 चे मानकरी
सिनिअर विंग : समाधान पवार (संगमेश्वर कॉलेज), वैभव नाने, अक्षय वढाळे (वायसीएम, करमाळा), सिद्धेश्वर थोरात (केबीपी, पंढरपूर) तर ज्युनिअर विंग : ऐश्वर्या मुटनार (एलएफसी).

यांना दिली जाते सलामी
देशाच्या आठ अतिमहत्त्वाच्या व्यक्ती. यात समावेश असतो, राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्र व राज्याचे संरक्षण प्रमुख व तीनही सेनादल प्रमुख.

महत्त्व ‘आरडीसी’लाच
‘आरडीसी’ म्हणजे रिपब्लिक डे कँप होय. राष्ट्रीय स्तरावरचे मोठे शिबिर. 28 डिसेंबर ते 28 जानेवारीदरम्यान चालते. 17 राज्यांतून 106 जणांचे पथक बनते. कौशल्य दाखवणार्‍यांना विशेष प्रावीण्याने गौरवण्यात येते. ही एक प्रकारची उच्च पदवी आहे.

पात्रता हेच कौशल्य
उंची 5 फूट 8 इंच ते 5 फूट 10 इंच असणे अनिवार्य आहे. 4.5 किलोची रायफल हाती घेऊन किमान 10 किलोमीटरपर्यंत शिस्तबद्ध चालण्याची क्षमता हवी.

अशी होते निवड
देशातील 13 लाखपैकी दोन हजार छात्रसैनिक पहिल्या फेरीला सामोरे जातात. पुढे चाळणी अधिक कठीण होऊन त्यातून पार झालेल्या 106 जणांना राजपथ संचलन, राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम, बेस्ट कॅडेट, फायरिंग, एअरो मॉडेलिंग, शिप मॉडेलिंग, समूह व एकल नृत्य यासाठी संधी मिळते. तर त्यातील तिघांची पथकाच्या अग्रभागी असणार्‍या ‘गार्ड ऑफ ऑनर’साठी (सलामीच्या कमानसाठी) निवड होते.

मानसिकता बदलणे गरजेचे
राजपथावर चालणार्‍या 12 ते 15 मिनिटांच्या संचलनासाठी सहा ते सात महिने सराव चालतो. कूप मेहनत घेतली जाते. एनसीसीकडे मुलींचा कल जास्त आहे. मात्र, मुलांची मानसिकता बदलणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना निर्माण करणे आणि महत्त्वाचे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे कौशल्य मिळवून देण्याचा प्रयत्न असतो. एकता व शिस्त हे ब्रीद आहे.’’ कीर्ती तिवारी, कॅप्टन, 38 महाराष्ट्र बटालियन