आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त करणार रात्रगस्त; चोर्‍या, घरफोड्यांवर पोलिसांची उपाययोजना सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील वाढत्या चोर्‍या, घरफोड्या यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रगस्त करणार असल्याचे पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. तसेच शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी नियोजन करणार आहे. सिग्नल यंत्रणा असलेल्या चौकात वाहतूक नियंत्रण, मर्यादेपेक्षा जादा रिक्षा प्रवासी वाहतूक रोखणे आदीबाबत अधिकार्‍यांना सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेशिस्त वाहनांवर कारवाई, वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. पोलिस आयुक्त रासकर यांच्याशी औपचारिक चर्चा करताना वाहतूक नियोजन सुधारण्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे आवर्जून सांगितले. चोर्‍या, घरफोड्या रोखण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू आहेत. शहराची शिस्त वाहतूक नियोजनावरून दिसून येते. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहणे खूप गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

ही कारवाई चुकतेय?
चार-पाच पोलिस मिळून सिग्नल यंत्रणा असलेल्या चौकात र्मयादेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणार्‍या अँपेरिक्षा, तीन आसनी रिक्षांवर कारवाई करतात. सिग्नल चौकात अशी कारवाई योग्य आहे का? सिग्नल चौकातून पुढे काही अंतरावर थांबून कारवाई करावी. चौकात कारवाई करताना मागावून येणारे वाहन पुढील वाहनाला धडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त दंडात्मक कारवाई केली जाते. अँपेरिक्षात चार प्रवासी तर तीन आसनी रिक्षात तीनच प्रवासी घेण्याचा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र आठ-दहा प्रवासी असतात.