आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Police News In Marathi, Lok Sabha Election, Police, Divya Marathi

सोलापूरकरांनो सावधान ! रात्री 11 नंतर फिरताना आढळल्यास होईल कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त - Divya Marathi
प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त

सोलापूर - निवडणूक प्रचार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यानंतर मंगळवारी व बुधवारी असे दोन दिवस रात्री अकरानंतर रस्त्यावर कुणीही कामाशिवाय फिरू नये. पोलिस चौकशीत काही संशयास्पद वाटल्यास कारवाई होईल, असा इशारा पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. खूपच महत्त्वाचे काम असेल आणि रुग्ण व नातेवाइकांना रुग्णालयात जाण्यासाठी मुभा आहे. नागरिकांना काही मदत पाहिजे असल्यास नियंत्रण कक्षात माहिती दिल्यास त्यांना मदत देण्यात येईल असे त्यांनी नमूद केले.


विधानसभा विभाग निहाय बंदोबस्त नेमण्यात आला आहे. शहर मध्यचे बंदोबस्त प्रमुख म्हणून पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील, शहर दक्षिणची जबाबदारी उपायुक्त अश्विनी सानप, शहर उत्तरची जबाबदारी उपायुक्त सुभाष बुरसे यांच्याकडे आहे. त्यांच्यासोबत स्ट्रायकिंग फोर्स, सहायक आयुक्त , निरीक्षक , फौजदार दर्जाचे अधिकारी साखळी पद्धतीने बंदोबस्त देतील.


अफवांवर विश्वास ठेवू नका
भयमुक्त, नि:पक्ष, शांततामय वातावरणात नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. काही चौकशी करायची असल्यास नियंत्रण कक्षात (0217-2744600) करावी.’’ प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त