आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारकी : नेत्यांच्या तोंडात पाणीच पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दक्षिण सोलापूर तालुक्याच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या इच्छुक नेत्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आमदार दिलीप माने यांना शह देण्यासाठी सुरेश हसापुरे यांनी विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. त्याच वाटेने जाताना आमदार माने यांनी हसापुरेंच्या निंबर्गी गावातच कार्यक्रम घेतला. तर भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुखांनी अलीकडेच मंद्रूपला मोठय़ा प्रमाणात खत वाटप कार्यक्रम घेतला. एकूणच हसापुरेंचे ‘घड्याळ’ आणि देशमुखांचे ‘कासव’ पळू लागल्याचे पाहून आमदार माने यांनी विकासकामांच्या निमित्ताने मतदारांना ‘हात’ जोडण्यास सुरुवात केली आहे.