आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Railway Department Demands Two New Train From Solapur

रेल्वेची मागणी : सोलापूरमधून दोन नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे अर्थसंकल्पासाठी सोलापूर विभागाने मध्य रेल्वे मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठवला असून, दोन नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. याशिवाय दोन गाड्यांचे विस्तारीकरण तसेच सोलापूर, पंढरपूर, कुर्डुवाडी, शिर्डी येथील स्थानकांवरील फलाटावर शेड मारण्यासाठी निधीची मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सोलापूरच्या किती मागण्या मान्य होतात, हे पाहण्यासारखे आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्यात रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. तत्पूर्वी सहा महिने अगोदर भारतीय रेल्वेतील १६ झोनकडून प्रस्ताव मागवण्यात येतात. त्यानुसार मध्य रेल्वे झोनअंतर्गत येणाऱ्या सोलापूर विभागाने प्रस्ताव पाठवून दिला आहे. मध्य रेल्वेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवून देण्यात येतो. मागणीची गरज लक्षात घेऊन रेल्वे बोर्ड यावर निर्णय घेतात. २०१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पासाठी सोलापूर रेल्वे विभागाने दोन गाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे. यात सकाळची सोलापूर-कोल्हापूर इंटरसिटी लातूर-मिरज एक्स्प्रेस अशा दोन गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय सिकंदराबाद-हुबळी ही गाडी सोलापूरपर्यंत तर मुंबई-पंढरपूर ही मिरजपर्यंत विस्तारीत करण्याची मागणी प्रस्तावात आहे. तसेच सोलापूर रेल्वे स्थानकासह पंढरपूर, कुर्डुवाडी, शिर्डी आदी स्थानकांवर शेड मारण्यास मंजुरी मिळावी त्यासाठी आवश्यक निधी मिळावा, ही मागणीही प्रस्तावात आहे. फलाटावरील शेडची मागणी जुनीच आहे. पुन्हा त्याचा समावेश करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेकडे प्रस्ताव सादर
^सोलापूररेल्वे विभागाने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मध्य रेल्वेकडून हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे जाईल. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर रेल्वे अर्थसंकल्पात सादर करण्यात येईल.'' नर्मदेश्वरझा, वरिष्ठवाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर
मागणी वेगळी, प्रस्ताव वेगळा
सोलापूर- हैदराबाद , सोलापूर -नागपूर, सोलापूर -गोवा, सकाळच्या सत्रात पुणे - सोलापूर आदी गाडया सुरू व्हाव्यात अशी सोलापूरकरांची मागणी आहे. मात्र गेल्या चार वर्षांत यातील एकही गाडी सुरू करण्यात आली नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात सोलापूर विभागाच्या प्रस्तावात सोलापूर मिरज प्रस्ताव आहे. दोन वषापूर्वी सोलापूर -कोल्हापूर गाडी सुरूच होती. त्यावेळी याला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत नसल्याने ही गाडी रात्री सोडण्यात येऊ लागली. मात्र या गाडीस रात्री देखील प्रतिसाद नसल्याने पुन्हा ही गाडी सकाळी सुरू करण्याचे प्रयत्न सोलापूर विभागाने सुरू केले आहेत.