आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Railway Division News In Marathi, Chennai Blast, Divya Marathi

चेन्नई येथील बॉम्बस्फोटाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे स्थानकाची तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चेन्नई येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून येथील रेल्वे स्थानकावर येणार्‍या प्रत्येक गाड्यांची तपासणी विशेष प्रशिक्षित श्वान पथकाकडून करण्यात येत आहे. फलाटापासून वातानुकूलित दर्जाच्या डब्यांची सुरक्षा तपासणी केली जात आहे.

रेल्वे स्थानकावरील प्रत्येक गोष्टीवर रेल्वे सुरक्षा पोलिसांची विशेष नजर आहे. विशेषत दक्षिण भारतातून येणार्‍या गाड्या तपासण्यात येत आहेत. रविवारी नागरकोईल -मुंबई व बेंगळुरु -मुंबई उद्यान एक्स्प्रेसची तपासणी विशेष श्वान पथकाकडून करण्यात आली. प्रथम, द्वितीय, तृतीय दर्जाचा वातानुकूलित डबा व शयनयान दर्जाचे डबे तपासण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावरील एक ते पाच फलाटही देखील तपासण्यात आले.

सीसीटीव्हीची नजर
रेल्वे स्थानकावरील सर्वच गाड्या डॉग स्कॉडने तपासण्यात येत आहे. तसेच स्थानकावर आमचे बारीक लक्ष आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. गोविंद देवकर, साहाय्यक सुरक्षा आयुक्त