आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल दिला, आता प्रतीक्षा आहे कारवाईची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रविवारी रात्री सोलापूर रेल्वे स्थानकावर जेवणावळ करून विनाकारण गाडी रोखून धरल्यामुळे पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेसला नाहक 40 मिनिटांचा उशीर झाला. रेल्वे कामकाजात अडथळा निर्माण झाल्याने या प्रकरणाची सोलापूर रेल्वे विभागाने गंभीर दखल घेतली. सोलापूर रेल्वे प्रशासनाने बुधवारी आयआरसीटीसीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे या प्रकरणाचा अहवाल पाठवला आहे. आता प्रतीक्षा करण्यात येणार्‍या कारवाईची आहे.

मुंबई येथील आयआरसीटीसीच्या कार्यालयाच्या वतीने बुक करण्यात आलेली यात्रा स्पेशल गाडी. रविवारी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी धर्मावरमवरून सोलापूर रेल्वे स्थानकावरील फलाट दोनवर पाणी भरण्यासाठी दाखल झाली. गाडीत पाणी भरल्यानंतर ही गाडी 15 मिनिटानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजे खंडवा जाणे अपेक्षित होते. मात्र पाणी भरून झाल्यानंतर देखील गाडीतील प्रवाशांनी आडमुठेपणा करत गाडी काढण्यास विरोध केला. रेल्वे प्रशासनाने सूचना देऊनही गाडी निघाल्यानंतर चेन ओढून गाडी थांबवून ठेवण्यात आली. यामुळे ‘हुतात्मा’ला 40 मिनिटांचा उशीर झाला. सोलापूर रेल्वे विभागाने याचा अहवाल पाठवला आहे. आता आयआरसीटीसी काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुंबईला पाठवला
स्टेशन प्रबंधकाकडून अहवाल येताच सोलापूर रेल्वे विभागाने तो पुढील कार्यवाहीसाठी मुंबईच्या आयआरसीटीसीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवला आहे. त्याच्या कारवाई होताच त्याची माहिती सोलापूर रेल्वे विभागाला कळवण्यात येईल.
-नरेंद्र पाटील, वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक