आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालधक्क्यांच्या विकासाचा प्रयत्न सुरू; 6 कोटी रुपयांचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर रेल्वे विभागातील बाळे, पंढरपूर व कु र्डुवाडी येथील मालधक्क्यांच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहे. त्यादृष्टीने या मालधक्क्यावर कव्हर घालण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडे गुरुवारी पाठवण्यात आलेला आहे. या कामासाठी 6 कोटी 75 लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच या तिन्ही मालधक्क्यांवर कव्हरशेड घालण्यात येणार आहे.

सोलापूर विभागातील रेल्वे मालधक्क्यावर कव्हरशेड घालण्याची सोलापूर हुंडेकरी असोसिएशनची मागणी होती. शेड नसल्याने ऊन व पावसामुळे मालधक्क्यातील मालाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते, असे असोसिएशनचे म्हणणे होते. सोलापूर विभागाने पाठविलेल्या प्रस्तावात मालगाडीचे 20 वॉगन सामावतील, अशा पद्धतीने 315 मीटर लांबीचा कव्हरशेड मालधक्क्यावर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे लोडिंग व अनलोडिंग करणे सोपे जाणार आहे. कव्हरशेडमुळे साखर व सिमेंट याचे संरक्षण होईल. तसेच मालवाहतूक करणार्‍या उत्पादक व व्यापार्‍यांना दिलासा मिळणार आहे. पर्यायाने सोलापूर रेल्वेस मालवाहतुकीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढणार आहे.

मालाचे संरक्षण होईल
रेल्वे मालधक्क्यांवरून मालाची आयात -निर्यात वाढविण्यासाठी कव्हरशेड बांधणे गरजेचे होते. त्यानुसार बाळे, पंढरपूर, कुडरुवाडी येथील मालधक्क्यांवरील कव्हरशेडसाठी प्रस्ताव पाठविला आहे. या शेडमुळे व्यापार्‍यांच्या मालाचे संरक्षण होण्यास मदत मिळणार आहे.’’ सुशील गायकवाड, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक.